Holy Roman Empress Maria Theresa Habsburg monarchy schonbrunn palace. Mitali Mathkar
देश विदेश

Maria Theresa : युरोपातील सर्वात पहिली महिला राणी, जिनं तब्बल ४ दशकं शासन केलं, जाणून घ्या इतिहास

Holy Roman Empress Maria Theresa : मध्य युरोपातील प्रसिद्ध हॅप्सबर्ग राजघराण्याची गादी जिनं चार दशकं सांभाळली, राज्य केलं, त्या राणी मारिया थेरेसांबद्दल जाणून घ्या रंजक गोष्टी.

Saam Tv

मिताली मठकर, साम टीव्ही

युरोपातील प्रसिद्ध हॅप्सबर्ग राजघराण्याची वारसदार आणि त्याच्या विशाल साम्राज्याची शासनकर्ती असलेली मारिया थेरेसा. तिची गोष्ट जरा निराळी आहे. कारण थोडाथोडका नव्हे तर १७४० ते १७८० एवढा प्रदीर्घ काळ ऑस्ट्रिया, हंगेरी, चेक रिपब्लिक (तेव्हाचा बोहेमिया प्रांत), स्लोव्हेनिया, क्रोएशिया, पोलंड, नेदरलँड, स्वित्झर्लंड, मिलान (आता इटलीत असलेला) असा प्रचंड टापू तिच्या अधिपत्याखाली होता. ती या प्रचंड साम्राज्याची सम्राज्ञी होती. विशेष म्हणजे तिच्या मृत्यूला तब्बल अडीचशे वर्षं झाल्यानंतरही तिच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा मध्य युरोपातील रस्त्यारस्त्यावर आजही दिसतात आणि त्या गौरवाने जतन केलेल्या आहेत.

मारिया थेरेसाकडे या साम्राज्याचं अधिकारपद आपत्कालीन परिस्थितीत आलं, मात्र आपण किती सक्षम आहोत ते तिने अल्पावधीतच संपूर्ण युरोपला दाखवून दिलं. तिचा जन्म ज्या हॅप्सबर्ग राजघराण्यात झाला होता ते घराणं युरोपातील प्रतिष्ठित राजघराणं होतं आणि या घराण्याने मध्ययुगात तब्बल सातशेहून अधिक वर्षं युरोपच्या मोठ्या प्रदेशावर राज्य केलं. याच राजघराण्यातील एक राजा चार्ल्स सहावा याची ही मुलगी. या राजाला मुलगा नव्हता, परिणामी त्याच्या मृत्यूनंतर राज्याच्या वारसदाराचा प्रश्न निर्माण होणार होता. मात्र चार्ल्सला आपल्या लेकीच्या सामर्थ्यावर आणि विवेकीपणावर पुरेपूर विश्वास होता. त्यामुळे त्याने एक विशेष कायदा करून मारिया थेरेसाला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं.

स्कॉनब्रुन पॅलेसची डोळे दीपवून टाकणारी भव्यता आणि मारिया थेरेसा यांचं तैलचित्र.

अर्थात एक स्त्री आपली शासक होणं, पुरुषांना कसं आवडणार? साहजिकच चार्ल्स सहावा, याच्या मृत्यूनंतर त्याच्या विशेष कायद्याला आव्हान दिलं गेलं. सगळीकडून उठावाचं वातावरण निर्माण झालं. मात्र मारिया थेरेसाने ही सारी परिस्थिती एखाद्या मुत्सद्दी व्यक्तीप्रमाणे हाताळली. तिने आपल्या सगळ्या सरदारांना भावनिक आवाहन केलं. त्यांच्या मदतीने युद्ध खेळून तिने आपल्या बहुतेक प्रदेशावर हुकुमत मिळवली... आणि अल्पावधीतच आपण एक उत्तम शासक असल्याचंही सिद्ध केलं. आपल्या साम्राज्यावरची राजकीय पकड घट्ट करतानाच तिने प्रशासकीय आणि सामाजिक सुधारणांनाही महत्त्व दिलं आणि त्यामुळेच ऑस्ट्रिया एक आधुनिक राष्ट्र बनलं.

हॅप्सबर्ग राजघराण्याचं निवासस्थान असलेला स्कॉनब्रुन पॅलेस हा खास थेरेसा टच असलेला पॅलेस. स्कॉनब्रुनचा अर्थच मुळी ब्यूटिफूल स्प्रिंग! बरोक आणि रोकोको या स्थापत्य शैलीत बांधलेल्या हा पॅलेसमध्ये तब्बल दीडेक हजार खोल्या आहेत. सतराव्या शतकापासून ते अगदी आता विसाव्या शतकात राजेशाही संपुष्टात येईपर्यंत या पॅलेसमध्ये हॅप्सबर्ग राजघराण्याचं वास्तव्य होतं. आताची या पॅलेसची भव्यता आणि सौंदर्य मात्र मारिया थेरेसाच्या काळातलं. आज या स्थापत्य कलेमुळेच या पॅलेसला जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. मारिया थेरेसाच्या कलादृष्टीची साक्ष देणाऱ्या अनेक वस्तू या पॅलेसमध्ये आजही पाहायला मिळतात. आज आपल्याला ज्या काही खोल्यांमधून फिरायला मिळतं, त्या प्रत्येक खोलीचं एक आगळेवेगळं वैशिष्ट्य आहे. यातल्या दोन खोल्यांमधील भिंतींवर दुर्मीळ चिनी चित्रकला पाहायला मिळते. तर एक खोली खास नेपोलियन (दुसरा) ची आहे. यातल्या प्रत्येक खोलीतले सहा फुटांहून अधिक उंचीचे आकर्षक सिरॅमिक हिटर्सही लक्ष वेधून घेतात. मारिया थेरेसाकडे केवळ सौंदर्यदृष्टीच होती असं नाही, तर तिची प्रशासकीय कार्यशैलीही वादातीत होती.

schonbrunn palace and Napoleon II

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने प्रादेशिक-खाजगी संस्थांचे अधिकार कमी करून किंवा त्या खालसा करून त्या संस्थांचं राष्ट्रीयीकरण केलं. जेणेकरून त्या संस्थांचा लाभ सर्वसामान्य माणसालाही घेता येईल. त्याशिवाय शिक्षण, व्यवसाय, न्याय... यांसारख्या बाबींमध्येही तिने समाजोपयोगी बदल केले. त्यामुळेच आजही तिचं नावं या साऱ्या प्रदेशांत गौरवाने आणि आदराने घेतलं जातं.

एवढ्या मोठ्या साम्राज्याचं सम्राज्ञीपण अभिमानाने मिरवणाऱ्या मारिया थेरेसाचं वैवाहिक आयुष्य देखील सुखासमाधानाचं होतं. मात्र तिने तब्बल सोळा मुलं जन्माला घातल्याचं आश्चर्य आजही सारेच व्यक्त करतात. दुर्दैवाची बाब म्हणजे ‘पाव नाही तर केक खा’ असं आपल्या गरीब आणि उपाशी जनतेला सांगणारी आणि जगप्रसिद्ध फ्रेंच राज्यक्रांतीला निमित्त ठरलेली फ्रान्सची राणी मारी आंत्वानेत ही, प्रथम आपल्या जनतेचा विचार करणाऱ्या मारिया थेरेसा हिची मुलगी होती!

मारिया तेरेसानंतर तिच्या इतर मुलांनी मात्र आपल्या आईप्रमाणेच आपल्या राज्याचा सांभाळ केला. नवनवीन सुधारणा घडवून आणल्या. पहिल्या महायुद्धापर्यंत हे साम्राज्य अखंड होतं. पहिल्या जागतिक महायुद्धात ऑस्ट्रिया-हंगेरीचा पराभव झाल्यावर, हे विशाल साम्राज्य अनेक लहान राष्ट्रांमध्ये (उदा. ऑस्ट्रिया, हंगेरी, चेक रिपब्लिक, क्रोएशिया) विभागलं गेलं आणि हॅप्सबर्ग राजवटीचा अंत झाला...

मात्र आजही या विशाल प्रदेशात फिरताना तिच्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा तिने उभारलेल्या भव्यदिव्य-प्रशस्त राजवाडे आणि इमारतींच्या रूपाने दिसत राहतात... इतिहास-संस्कृती जपताना केवळ भावनिकता महत्त्वाची नसते तर, ती जपण्याची इच्छाशक्तीही तेवढीच महत्त्वाची असते. ती इच्छाशक्ती आजही इथल्या जनतेनं आणि राज्यकर्त्याँनीही कायम ठेवलीय हे विशेष!

schonbrunn palace

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्यातील पार्कमधील इमारतीच्या जाळीला अचानक आग

कल्याणकरांसाठी मोठी बातमी! आरोग्य विभागाने माता आणि नवजात बालकांसाठी घेतला गेमचेंजर निर्णय

Rupali Thombare: अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा, नेमकं काय प्रकरण?

White Collar Terror: व्हाईट कॉलर दहशतवाद, दिल्ली स्फोटाशी 5 डॉक्टराचं कनेक्शन ?

OBC Reservation On Corporators: ओबीसी कोट्यामुळे 'या' नगरसेवकांना मोठा धक्का|VIDEO

SCROLL FOR NEXT