Hinduja Group Chairman SP Hinduja dies at 87 Saam TV
देश विदेश

SP Hinduja Death: हिंदुजा ग्रुपचे चेअरमन एसपी हिंदुजा यांचे निधन, 87 व्या वर्षी लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास

हिंदुजा ग्रुपचे चेअरमन एसपी हिंदुजा यांचे निधन, 87 व्या वर्षी लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास

Satish Kengar

SP Hinduja Death: हिंदुजा ग्रुपचे (Hinduja Group) चेअरमन श्रीचंद परमानंद हिंदुजा यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. चार हिंदुजा बंधूंमध्ये एसपी हिंदुजा हे सर्वात मोठे होते. लंडनमध्ये त्यांचं निधन झालं. हिंदुजा कुटुंबाने याबाबत माहिती दिली आहे.

हिंदुजा कुटुंबीयांनी याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की, 'आज आमचे कुटुंबीय आणि हिंदुजा ग्रुपचे चेअरमन एसपी हिंदुजा यांचे निधन झाल्याची घोषणा करताना गोपीचंद, प्रकाश, अशोक आणि संपूर्ण हिंदुजा कुटुंबाला अतिशय दुःख होत आहे.  (Latest Marathi News)

Hinduja Group : वडिलांच्या मृत्यूनंतर मिळाला वारसा

हिंदुजा ग्रुप हे ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यावसायिक घराण्यांपैकी एक आहे. १९७१ मध्ये परमानंद हिंदुजा यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी कौटुंबिक वारसा हाती घेतला. अशोक लेलँड, गल्फ ऑइल, हिंदुजा बँक स्वित्झर्लंड, इंडसइंड बँक, हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स, हिंदुजा टीएमटी, हिंदुजा व्हेंचर्स, इंडसइंड मीडिया आणि कम्युनिकेशन्स लिमिटेड या त्यांच्या प्रमुख कंपन्या आहेत.

Bofors Scandal : बोफोर्स घोटाळ्यात आलं होतं नाव

८० च्या दशकात बोफोर्स घोटाळ्यात एसपी हिंदुजा यांचे नाव समोर आले होते. त्यावेळी असा आरोप करण्यात आला होता की, गांधी कुटुंबाशी जवळीक असल्यामुळे हिंदुजा बंधूंना स्वीडिश कंपनीच्या बाजूने करार करण्यास नियुक्त करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT