JNU University News saam tv
देश विदेश

'कम्युनिस्टांनो भारत सोडा...'; जेएनयू विद्यापीठात भिंतीवर हिंदू रक्षा दलाच्या भडकाऊ घोषणा

जेएनयूमधील इमारतीच्या भिंतींवर ब्राह्मणविरोधी घोषणा लिहिण्यात आल्याने झालेला वाद ताजा असताना पुन्हा एका नव्या वादाने तोंड फुटलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

JNU University News : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. जेएनयूमधील इमारतीच्या भिंतींवर ब्राह्मणविरोधी घोषणा लिहिण्यात आल्याने झालेला वाद ताजा असताना पुन्हा एका नव्या वादाने तोंड फुटलं आहे. जेएनयूमधील इमारतीच्या भिंतींवर 'कम्युनिस्टांनो भारत सोडा...,जिहादींनो भारत सोडा...' या आशयाच्या घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. या घोषणेमुळे विद्यापीठातील (University) वातावरण तापलं आहे. या घोषणेची जबाबदारी हिंदू रक्षा दलाने घेतली आहे. (Latest Marathi News)

हिंदू रक्षा दलाने जेएनयूमधील इमारतीच्या भिंतींवर कम्युनिस्टांनो भारत सोडा,जिहादींनो भारत सोडा' या घोषणा लिहिल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. काही दिवसांपूर्वीच जेएनयू विद्यापीठात इमारतीच्या भिंतींवर 'ब्राह्मणांनो, कॅम्पस सोडून जा' अशा आशयाची घोषणा लिहिली होती. त्यामुळे जेएनयू प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर जेएनयू (JNU) प्रशसनाने शुक्रवारी घटनास्थळी सीटीटीव्ही कॅमेरा लावण्याचे निर्देश दिले होते. '

ब्राह्मणांनो, कॅम्पस सोडून जा...'; JNU मध्ये भिंतीवर वादग्रस्त घोषणा

विद्यार्थ्यांनी केलेल्या दाव्यानुसार स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडिज्-II भवनच्या भिंतींवर ब्राह्मण आणि बनिया समजाविरोधात घोषणा लिहिल्या गेल्या होत्या. त्यानंतर जेएनयूचे कुलपती शांतिश्रि डी. पंडित यांनी शुक्रवारी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.

डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांचं हे कृत्य असल्याचा आरोप आरएसएस प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला. 'कम्युनिस्ट गुंडांकडून शैक्षणिक ठिकाणांची मोठ्या प्रमाणात गैरवापर होत आहे, असं म्हणत ABVPने याचा निषेध केला. प्राध्यापकांच्या खोलीच्या फोडून त्यांना धमकावलं असल्याचीही माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाचा जलसाठा पोहोचला 35 टक्क्यांवर

Highway tyre puncture: हायवेवर टायर पंक्चर झाल्यास काय कराल?

Oral Health Tips: रोज फक्त 2 मिनिटांचा हा उपाय ठरू शकतो दातांसाठी फायदेशीर; डॉक्टरांनी सांगितल्या तोंडाच्या आरोग्याच्या महत्त्वाच्या सवयी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? ८ दिवसांत पैसे जमा होण्याची शक्यता, महत्त्वाची अपडेट समोर

ZP School : जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला; १३ विद्यार्थी गंभीर, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT