Himachal Pradesh Cable Car Trolly Incident Latest News
Himachal Pradesh Cable Car Trolly Incident Latest News SAAM TV
देश विदेश

VIDEO: अचानक केबल कार थांबली, दीडशे फुटांवर अडकले ८ पर्यटक अन्...

साम ब्युरो

सोलन: हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात थरारक घटना घडली आहे. टिंबर ट्रेल रोप वेच्या केबल कारमध्ये आठ पर्यटक अडकले. केबल कार थांबल्यानं त्यात असलेले पर्यटक अडकले. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.

पर्यटकांच्या सुटकेसाठी बचावकार्य हाती घेण्यात आलं आहे. अडकलेल्या पर्यटकांमध्ये काही महिला देखील आहेत. दरम्यान, तीन जणांची सुखरुप सुटका करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. (Himachal Pradesh Cable Car Trolly Incident)

मिळालेल्या माहितीनुसार, दीडशे फूट उंचावर केबल कार थांबली. त्यामुळे पर्यटक (Tourist) घाबरले. रोप-वेच्या ट्रॉलीमध्ये ८ जण अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. बचावपथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सुरुवातीला ११ जण या ट्रॉलीत अडकल्याची माहिती होती. बचाव पथकाने तीन पर्यटकांना सुखरूप उतरवलं आहे. (Rescue Operation)

अडकलेल्या पर्यटकांची सुटका करण्यासाठी दुसरी केबल कार ट्रॉली पाठवण्यात आली आहे. सोलन जिल्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

काँग्रेसचे सोलन येथील आमदार कर्नल धनी राम शांडिल यांनी सांगितलं की, 'जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. लवकरच सर्व पर्यटकांची सुटका करण्यात येईल. लष्कराचीही मदत घेतली जाईल.' सोलन जिल्ह्यातील परवाणू येथील ट्रिंबर ट्रेलच्या ठिकाणी ही केबल कार १९८८ मध्ये सुरू करण्यात आली आहे. यापूर्वीही असे अपघात घडले आहेत. १९९२ मध्ये या ठिकाणी १० पर्यटक आणि एक ऑपरेटर अडकला होता.

३० वर्षांपूर्वी ११ पर्यटक अडकले होते

१९९२ मध्ये घडलेल्या घटनेत ऑपरेटरने ट्रॉलीमधून उडी मारली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. तर उर्वरित १० पर्यटकांची सुटका करण्यात आली होती. सोलन येथील टिंबर केबल कारमधून सैर करण्यासाठी हिमाचल प्रदेशसह चंदीगडमधूनही अनेक पर्यटक येतात. हे ठिकाण चंदीगडपासून जवळ आहे. त्यामुळे चंदीगडमधून विकेंडला पर्यटक या ठिकाणी येतात.

यावर्षी देखील सोलनमध्ये पर्यटकांची तुफान गर्दी झाली होती. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर या विकेंडलाही मोठी गर्दी झाली होती.

Edited By - Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT