Himachal Bus Accident Saam TV Marathi
देश विदेश

Accident : २२ प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, ४ जणांचा मृत्यू

Himachal bus accident : हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात सोझा परिसरात २२ प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून १८ जणांना बचाव पथकांनी सुरक्षित बाहेर काढले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Namdeo Kumbhar

Himachal Pradesh Kullu bus accident latest update : हिमाचल प्रदेशमध्ये २२ प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली आहे. रात्रीच्या वेळी कुल्लूमधील सोझाजवळ बस दरीत कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या बसमधील २२ प्रवाशांपैकी १८ जणांना वाचवण्यात आले आहे. अपघातामधील सर्व जखमींना जवळच्या सरकारी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रशासन, पोलीस, महसूल विभाग, अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाने रात्रभर बचावकार्य राबवले.

कुल्लू येथील पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोझाजवळ रस्त्यावरून घसरून एका बसचा अपघात झाला. या बसमध्ये २ मुलांसह २२ जण होते. त्यापैकी १८ जणांना वाचवण्यात आले आहे. सर्वांना उपचारासाठी बंजार येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत २ पुरुष आणि २ महिलांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्यातील सोझाजवळ पर्यटकांच्या ट्रॅव्हलर वाहनाला भीषण अपघात झाला. सोझा परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने हे वाहन थेट खोल दरीमध्ये कोसळले.

प्रशासन, पोलीस, महसूल विभाग, अग्निशमन दल आणि आरोग्य विभाग यांच्याकडून रात्री संयुक्तपणे बचावकार्य केले. स्थानिकांकडून तात्काळ मदतीसाठी धाव घेण्यात आली. अपघातामधील मृतांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे. दरम्यान कुल्लूचे जिल्हा दंडाधिकारी अनुराग चंदर शर्मा यांनी सांगितले की, शोध आणि पडताळणी मोहीम अजूनही सुरू आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहे. तसेच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकांनी वेळेवर केलेल्या मदतीमुळे १८ जणांचे प्राण वाचवता आले. जखमींना सर्वोत्तम उपचार देण्यास आमचे प्राधान्य आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Live News Update: आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी पाण्यात विसर्जित न करता केले वृक्षारोपण

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

Pune Crime: पुणे हादरले! ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आवाज ऐकून शेजारच्या खिडकीतून डोकावलं, दृश्य पाहून आई घाबरली

Viral Video : बाप असावा तर असा... मुलीच्या घटस्फोटानंतर ढोल ताशा वाजवत लेकीला आणलं घरी, नेटकऱ्यांनी म्हटलं...

SCROLL FOR NEXT