एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX-1086 विमानात दोन प्रवाशांनी कॉकपिट दरवाजा उघडण्याचा प्रयत्न
पायलटने सीसीटीव्हीवर प्रवाशांची हालचाल पाहिली
विमान सुरक्षितपणे वाराणसीत लँड करण्यात आलंय
पोलिसांनी ९ प्रवाशांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू
बेंगळुरू-वाराणसी एअर इंडिया विमानात धक्कादायक घटना घडली. बेंगळुरू-वाराणसी मार्गावरील एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX-1086 विमानात सोमवारी दोन प्रवाशांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पायलटने हायजॅकच्या संशयाने कॉकपिट उघडला नाही. पायलटने तातडीने एटीसीला माहिती दिली. पुढे सुरक्षा एजन्सीला माहिती देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या विमानाचं वाराणसीत सुरक्षितपणे लँडिग करण्यात आलं. त्यानंतर वाराणसीत सुरक्षितपणे लँडिग केल्यानंतर दोन प्रवाशांसहित ९ जणांना ताब्यात घेण्यात आलं. वाराणसी पोलिसांनी या ९ प्रवाशांची चौकशी सुरु केली. विमानात एकूण १६३ प्रवासी होते.
विमानाचं लँडिंग हे वेळेच्या आधीच करण्यात आलं. या घटनेने खळबळ उडाली. एयर इंडिया एक्स्प्रेसच्या विमान आयएक्स १०८६ बेंगळुरुवरून निघाल्यानंतर वाराणसीला निघालं होतं. विमान हवेत असताना दोन प्रवाशांनी कॉकपिटसाठी तयार केलेल्या केबिनचा गेट उघडण्याचा प्रयत्न केला. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर कॉकपिट उघडण्यासाठी कॉकपिट उघडण्यासाठी पासकोड टाकल्याचा सिग्नल पायलटजवळ पोहोचला. पायलटने दोघांना सीसीटीव्हीमधून पाहिलं. दोन्ही प्रवासी विमान हायजॅक करत असल्याच्या संशयाने कॅप्टनने दरवाजा उघडला नाही.
शौचालय शोधत असताना चुकून प्रवाशांनी कॉकपिटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. एअरलाइनने घटनेची पुष्टी करताना सांगितलं की, या प्रकारामुळे कोणताही सुरक्षा प्रोटोकॉल भंग झालेला नाही. विमानाचं सुरक्षितपणे वाराणसी येथे लँडिग करण्यात आलं आहे. या प्रकरणाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. वाराणसीत पोहोचल्यानंतर गोंधळ घालणाऱ्या सर्व प्रवाशांना सीआयएसएफकडे सोपवण्यात आले'.
कोणत्या विमानात घडली घटना?
एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX-1086 या बेंगळुरू-वाराणसी विमानात घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
दोन प्रवाशांनी नेमकं काय केलं?
दोन प्रवाशांनी शौचालय समजून चुकून विमानातील कॉकपिट दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.