Hijab controversy: हिजाब वाद वाढला! कर्नाटकात शाळा-कॉलेज तीन दिवस बंद, मुख्यमंत्री म्हणाले... Saam TV
देश विदेश

Hijab controversy: हिजाब वाद वाढला! कर्नाटकात शाळा-कॉलेज तीन दिवस बंद, मुख्यमंत्री म्हणाले...

कर्नाटकात हिजाब वाद वाढल्याने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मोठी निर्णय घेतला आहे.

वृत्तसंस्था

कर्नाटकात (Karnataka) हिजाब वाद (Hijab controversy) वाढल्याने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) यांनी मोठी निर्णय घेतला आहे. बोम्मई यांनी राज्यात (state) पुढील ३ दिवसांसाठी सर्व शाळा (School) आणि कॉलेज (College) बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले की, ‘आम्ही कर्नाटकच्या उच्च न्यायालयाच्या (High Court) आदेशाची वाट बघत आहोत. मी विद्यार्थ्यांना (students) शांती आणि सलोखा राखण्याची आवाहन करतो. तसेच मी शाळेच्या प्रशासनाला (administration) आदेश दिले आहेत की, विद्यार्थ्यांमध्ये कोणतेही वाद होऊ नये. (Hijab controversy School college closed three days Karnataka)

हे देखील पहा-

तसेच पुढे कर्नाटकचे मुख्यमंत्री सांगितले आहे की, ‘बाहेरील सर्व संबंधित व्यक्तींना चिथावणीखोर वक्तव्य करू नये, असे आवाहन यावेळी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून सांगितले आहे की, ‘सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा आणि कॉलेज प्रशासनाबरोबर कर्नाटकांच्या लोकांना शांती आणि सलोखा राखण्याचे आवाहन करतो. मी पुढील ३ दिवसांसाठी शाळा आणि कॉलेज बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व संबंधितांना सहकार्याची विनंती आहे.

कर्नाटकच्या काही शाळांमध्ये काही मुलींनी हिजाब घालून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांचा अडकाव करण्यात आला आहे. यावरून सध्या हा वाद कर्नाटकात चांगलाच पेटला आहे. ठिकठिकाणी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. यादरम्यान राज्याचे गृहमंत्री अराग ज्ञानेंद्र यांनी सर्व पक्षांना शांतता राखण्याचे आव्हान केले होते. तसेच पोलीस बळाचा वापर करण्यास भाग पाडू नये, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले होते. पण आता कर्नाटकातील उडुपी, शिवमोग्गा, बागलकोट आणि इतर भागामध्ये असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये तणाव वाढल्यामुळे पोलीस आणि प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला आहे.

दरम्यान आज कर्नाटक उच्च न्यायालयात उडुपी येथील कॉलेजमध्ये हिजाब घालण्याची परवानगी मागणाऱ्या विद्यार्थ्यांच्या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. कर्नाटकचे गृहमंत्री म्हणाले आहेत की, ‘तुम्ही सर्वजण विद्यार्थी शिक्षित आहात, तुम्हाला तुमच्या भविष्याचा विचार केला पाहिजे. कोरोना काळानंतर २ वर्षांनी यावर्षी वर्ग व्यवस्थित सुरू झाले आहेत. पुढील काही महिन्यात परीक्षा सुरू होणार आहेत, त्याकरिता तयारी करण्याची हीच वेळ आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंढरपुरात कालव्यातील पाण्याची नासाडी

5 Potato Recipe: नवरात्रीच्या उपवासासाठी स्पेशल रेसिपी! बटाट्यापासून बनवा 5 उपवासाचे पदार्थ

Hair Fall: केसगळती आणि केस तुटण्याची समस्या होईल कमी; आठवड्यातून २ वेळा लावा हे घरी बनवा खास तेल

Navratri Fasting Recipe : नवरात्रीत उपवासाला गोड खाण्याची मजाच वेगळी, 'असा' बनवा मऊसूत रताळ्याचा शिरा

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, दिल्लीतील वातावरण तापले

SCROLL FOR NEXT