Munmun Dutta Arrested: तारक मेहता फेम बबिताला अटक...नेमकं काय घडलं वाचा

"तारक मेहता का उल्टा चष्मा" मालिकेतील बबिता म्हणजे अभिनेत्री मुनमुन दत्ता ही चांगलीच अडचणीत सापडली
Munmun Dutta Arrested
Munmun Dutta ArrestedSaam Tv
Published On

मुंबई: "तारक मेहता का उल्टा चष्मा" (aarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेतील (Series) बबिता म्हणजे अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) ही चांगलीच अडचणीत सापडली आहे. तिने रविवारी एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) शेअर केला होता. यामध्ये तिने जातीवाचक आणि अपमानजनक शब्दांचा वापर केल्याने तिच्याविरुध्द हरियाणा (Haryana) राज्यात हांसीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मला यूट्यबवर (youtube) यायचे आहे. त्यामुळे मला चांगले दिसायचे आहे. ***सारखे नाही, असे म्हणत असताना तिने जातीवाचक शब्दाचा वापर केला आहे. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Munmun Dutta Arrested)

हे देखील पहा-

तिचा हा व्हिडिओ (Video) प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तिच्या विरोधामध्ये संतापाची लाट निर्माण झाली. नॅशनल अलायन्स फॉर दलित ह्यूमन राईट्सचे संयोजक रजत कालसन यांनी अभिनेत्री (Actress) मुनमुन दत्तावर एट्रोसिटी कायद्या्ंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा गुन्हा अजामीनपात्र आहे. यामुळे तिला अटक (Arrested) झाल्यास न्यायालय जामीन नाकारु शकते.

यामुळे मुनमुनला तुरुंगातची हवा खावी लागू शकते. हे व्हिडिओ प्रकरण अंगलट आल्याचे लक्षात आल्यावर अभिनेत्री मुनमुन घाबरली आहे. तिने तातडीने झालेल्या प्रकाराविषयी एक निवेदन प्रसिध्द करुन माफी मागितली आहे. बोलण्याच्या ओघात हा शब्द तोंडून आला आहे. कुणाच्या देखील भावना दुखवण्याचा, अपमान करण्याचा हेतू नव्हता, असे तिने यामध्ये सांगितले आहे. तिने दिलगीरी व्यक्त केली असली तरी हा व्हिडिओ अजून देखील व्हायरल आहे. यामुळे अनेकांनी तिच्यावर तीव्र टीका केली आहे. अनेकांनी तिला अटक करावी, अशी मागणी केली आहे.

Munmun Dutta Arrested
Beed: अजित पवारांच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा थेट विरोध; राजकीय वातावरण तापलं

मुनमुन दत्ता उर्फ बबिताला (Munmun Dutta) अटक झाल्याची माहिती समोर आली. कोर्टाच्या आदेशानुसार मुनमून दत्ता ही हांसी येथे पोलिसांसमक्ष (Munmun Dutta Arrested) हजर झाली. यावेळी अटकेची कारवाई पूर्ण करून मुनमुनची ४ तास चौकशी करण्यात आली आहे. चौकशी केल्यानंतर तिला जामिनावर (Interim Bail) सोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com