Beed: अजित पवारांच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा थेट विरोध; राजकीय वातावरण तापलं

कार्यक्रमाच्या बॅनरवर 35 फोटो, नवख्यांना स्थान मात्र जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
Beed: अजित पवारांच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा थेट विरोध; राजकीय वातावरण तापलं
Beed: अजित पवारांच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा थेट विरोध; राजकीय वातावरण तापलंSaam Tv
Published On

बीड: बीड (Beed) जिल्ह्यात विकास कामाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये चांगलीच बिघाडी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विशेष काम म्हणून मंजुरी दिलेल्या कामांवर, राष्ट्रवादीचे आमदार (NCP MLA) संदीप क्षिरसागर (Sandeep Kshirsagar) डल्ला मारत असल्याचा, थेट आरोप करत, आज झालेल्या शंभर कोटींच्या विकास कामाच्या उद्घाटनाला विरोध दर्शवत, काळे झेंडे दाखवून प्रचंड घोषणाबाजी करत शिवसैनिक (Shiv Sainik) रस्त्यावर उतरले आहेत. तर याच विकास कामाच्या उद्घाटनाच्या बॅनरवर नुकत्याच राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केलेल्या नवख्यासह 30 ते 35 जणांचे फोटो होते. (Shiv Sena directly opposes Ajit Pawar program)

मात्र, त्यावरून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांचा फोटो (Photo) गायब असल्याचे दिसून येत आहे. यामुळे त्यांची देखील नाराजगी असल्याची चर्चा जिल्ह्यात सध्या सुरु आहे. बीडमध्ये (Beed) महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याचे कारण देखील तसेच आहे. बीड मतदारसंघातील विकास कामाच्या उद्घाटनावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने- सामने आली आहे. थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमा अगोदर शिवसैनिकांनी बॅनरबाजी करत, काळे झेंडे दाखवले होते. तसेच अजित दादा तुमच्या आमदारांना आघाडीचा धर्म शिकवावा, असे म्हणत घोषणाबाजी केली.

हे देखील पहा-

यामुळे बीडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत चांगलेच वातावरण तापल्याचे दिसून आले आहे. शिवसैनिकांनी आणलेल्या कामाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे आमदार करत आहेत. तसेच विकास कामात खोडा घालत असल्याचा आरोप देखील शिवसैनिकांनी केला आहे. यावर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने काम करत आहे. मात्र, याला अपवाद बीडचा आहे. शिवसेनेने आणलेल्या विकास कामावर, डल्ला मारण्याचे काम राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार करता आहेत. (Shiv Sena directly opposes Ajit Pawar program)

तसेच विकास कामात खोडा घालण्याचे काम देखील आमदार करत आहेत, असा आरोप करत महाविकास आघाडीत आघाडीचा धर्म फक्त शिवसेनेनेच पाळायचा का? राष्ट्रवादीला याचे सोयरसुतक नाही का? अजितदादांनी आपल्या स्थानिक आमदारांना सांगून आघाडीचा धर्म पाळायला सांगावा, असे देखील यावेळी सचिन मुळूक यांनी सांगितले आहे. तसेच आमचा हा आवाज आणि या तीव्र भावना राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पर्यंत पाठवण्यासाठी आम्ही निषेध व्यक्त केला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. बीडमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात लढत झाली.

Beed: अजित पवारांच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा थेट विरोध; राजकीय वातावरण तापलं
UP Election: कॉलेज विद्यार्थिनींना मोफत स्कूटी अन् 3 कोटी रोजगार देणार; अमित शहांचा जाहीरनामा प्रसिद्ध

महाविकास आघाडी म्हणून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी आणलेली विकास कामाचे उद्घाटन आणि लोकार्पण होतं. मी स्वतः सुद्धा शिवसेनेच्या सर्वांना निमंत्रण दिले होते. काही जणांनी निषेध व्यक्त केला असेल, तर ते आमच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा नाही, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली आहे. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हाध्यक्षांचा बॅनरवर फोटो नाही, काही वेळेस काही डिजिटलमध्ये चुकून असे फोटो राहत असतात. असे म्हणत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांच्या बद्दल बोलणे टाळत, बजरंग बप्पा हे मागील काही दिवसापासून राष्ट्रवादी व पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. (Shiv Sena directly opposes Ajit Pawar program)

यातच या कार्यक्रमांमध्ये अनुपस्थिती आणि बॅनरवरील फोटो नसणे, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावर धनंजय मुंडे यांनी सावध प्रतिक्रिया देत पत्रकारांना चुका शोधण्याची सवय असते असे म्हणत वेळ मारून नेली आहे. दरम्यान बीडमधील विकास कामाच्या उद्घाटनावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात चांगलीच जुंपली आहे. यातच पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर खुद्द राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे हे देखील नाराज असल्यामुळे, नेमक बीडमध्ये महाविकास आघाडीत चाललय काय? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या, या सुरू असलेल्या महाविकास आघाडीतील बिघाडीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सहाजिकच पुढील काळात महाविकास आघाडीतील हे नाराजी नाट्य कुठपर्यंत चालतं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com