Uttar Pradesh Accident Saam Tv
देश विदेश

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! पंक्चर काढताना पिकअपला अज्ञात वाहनाची धडक; चाकाखाली चिरडून ४ तरुणांचा मृत्यू

Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेश अज्ञात वाहनाच्या धडकेत ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पिकअपचे पंक्चर काढत असताना ही घटना घडली.

Priya More
  • कौशांबीतील त्रिलोकपूर येथे महामार्गावर भीषण अपघात

  • पंक्चर झालेल्या पिकअपची दुरुस्ती सुरू असताना अज्ञात वाहनाने धडक दिली

  • या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला

  • पोलिस अपघाताचा तपास करत आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सैनी कोतवाली परिसरातील त्रिलोकपूर येथे ही अपघाताची घटना घडली. गाडी पंक्चर झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला पंक्चर दुरूस्तीचे काम करत असताना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातामध्ये चालकासह ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, त्रिलोकपूर येथील कांगन हॉटेलसमोर पंक्चर झालेला पिकअप ट्रक दुरुस्तीचेकाम सुरू होते. रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करून दुरूस्ती केली जात होती. त्याचवेळी एका अज्ञात वाहनाने पिकअपला धडक दिली.या अपघातामध्ये पिकअप चालकासह चार तरुण गंभीर जखमी झाले होते. स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्या चौघांनाही रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तपासणी करून चौघांना मृत घोषीत केले.

या भीषण अपघातामध्ये साबिर, अकबर, अन्वर आणि एहसान या चौघांचा मृत्यू झाला. अपघाताची ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. त्यांना चिरडणाऱ्या वाहनाचा पोलिस शोध घेत आहेत. हा अपघात इतका भीषण होता की चौघांच्या मृतदेहाचे तुकडे झाले होते. चारही तरुणांच्या कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यूमुळे मोठा धक्का बसला आहे. पोलिस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात पाऊस सुरू असला तरी धुळे जिल्ह्यात अलनिनोचा प्रभाव जाणवणार कृषी अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांना अलर्ट

Ayodhya Ram Temple : अयोध्येतील राम मंदिर व्यवस्थेत मोठे बदल; देणगी घोटाळ्यानंतर सर्वच नियम बदलले

फक्त नथच नाही! नोज पिनच्या या ५ सुंदर डिझाईन्स साडीवर उठून दिसतील

Rent Agreement: रेंट एग्रीमेंट संपण्यापूर्वीच भाडेकरूने घर सोडल्यास डिपॉझिटचे काय होते? घरमालक पैसे जप्त करू शकतो का?

Sanjay Raut: शरद पवार कधीच एनडीएमध्ये जाणार नाहीत; संजय राऊतांचं वक्तव्य

SCROLL FOR NEXT