Spain Floods Video Saam Tv
देश विदेश

Spain Floods Video: स्पेनमध्ये पावसाचा हाहाकार, पुरामध्ये प्रवाशांसह वाहून गेल्या कार, भयंकर VIDEO आला समोर

Spain Heavy Rainfall: या व्हिडिओमध्ये (Spain Floods Video) पूरामध्ये प्रवाशांसह कार वाहून गेल्या असल्याचे दिसत आहे.

Priya More

Spain Rainfall: स्पेनमध्ये मुसळधार पावसाने (Spain Rainfall) हाहाकार माजवला आहे. या पावसामुळे ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे स्पेनमध्ये जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे स्पेनमध्ये महापूर आला आहे. या पूराच्या पाण्याखाली स्पेनमधील अनेक शहरं गेली आहेत.

ईशान्य स्पेनमधील झारागोझा शहराची स्थिती अत्यंत वाईट आहे. स्पेनमधील पूराचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशामध्ये एक भयंकर व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये (Spain Floods Video) पूरामध्ये प्रवाशांसह कार वाहून गेल्या असल्याचे दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्पेनमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शहरातील रस्त्यांना नद्यांचे रुप आले आहे. अचानक आलेल्या पुरामुळे अनेक कार वाहून गेल्या आहेत. आपला जीव वाचवण्यासाठी कारमधील प्रवासी प्रयत्न करत आहेत. पण पाण्याचा प्रवाह इतका आहे की ते हतबल झाले आहेत. या प्रवाशांना वाचवण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. पूरामध्ये अडकलेल्या काहींची सुटका करण्यात आली आहे. इतरांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत पूर्वोत्तर स्पेनमधील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे आणि वादळामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. उत्तर आरागॉन आणि दक्षिण नवरे याठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही भागांना आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, ईशान्य स्पेनमध्ये आजही वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे होणारे नुकसान लक्षात घेता याठिकाणच्या सरकारने नागरिकांना घरातून बाहेर पडू नका, तसंच प्रवास करु नका असे आवाहन केले आहे. काही महिन्यांपूर्वीही स्पेनमध्ये पाऊस आणि पुराने कहर केला होता. त्यावेळीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मे महिन्यात आलेल्या पुरात वाहनं वाहून गेल्याची देखील घटना घडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

SCROLL FOR NEXT