Himachal Pradesh Rain Saam Tv
देश विदेश

Himachal Pradesh Rain Update: हिमाचलमध्ये धो-धो, पावसाने मोडला 50 वर्षांचा रिकॉर्ड; कागदाच्या होडीसारख्या वाहत गेल्या गाड्या

Himachal Pradesh Record Break Rain: हिमाचलमध्ये धो-धो, पावसाने मोडला 50 वर्षांचा रिकॉर्ड; कागदाच्या होडीसारख्या वाहत गेल्या गाड्या

Satish Kengar

Himachal Pradesh Rain: हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाने अक्षरश: कहर केला आहे. सतत सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. याच पुरात अनेक वाहने कागदाच्या कागदाच्या होडी सारखे वाहत गेल्याचे अनेक व्हिडीओही देखील समोर आले आहेत.

हवामान विभगाने हिमाचलमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील अनेक भाग जलमय झाले असून अनेक रस्ते, वाहने आणि घरे पुरात वाहून गेली आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी भूस्खलनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. मनालीमध्ये 20 पूर पीडितांना वाचवण्यात आलं आहे. पाऊस आणि पुरामुळे राज्यभरात 300 हून अधिक लोक विविध ठिकाणी अडकले आहेत.

अनेक ठिकाणी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मुसळधार पावामुळे चंदीगड आणि मनाली राष्ट्रीय महामार्गासह 765 रस्ते बंद करण्यात आले. गेल्या 48 तासांत भूस्खलनाच्या 20 मोठ्या घटना घडल्या आहेत. शिमला-कालका रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक प्रभावित झाली आहे. पुढील दोन दिवस राज्यभरातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. (Latest Marathi News)

मुख्यमंत्र्यांनी मदत आणि बचाव कार्याचा घेतला आढावा

दरम्यान, मुख्यमंत्री ठाकूर सुखविंदर सिंह सुखू वैयक्तिकरित्या मदत आणि बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत. ते राज्य आणि जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहेत, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत लोकांना वेळेवर मदत करता येईल. रविवारी सायंकाळी उशिरा मुख्यमंत्र्यांनी सर्व उपायुक्तांशी बोलून संबंधित जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेतला आणि बाधितांना तातडीने मदत देण्याच्या सूचना दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT