Heavry Rainfall In New York City: Saamtv
देश विदेश

New York Flood: न्यूयॉर्कमध्ये पावसाचा हाहाकार! घरे, महामार्ग पाण्याखाली; गाड्या वाहून गेल्या, धडकी भरवणारा व्हिडिओ

Heavry Rainfall In New York City: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराला शुक्रवारी (२९, सप्टेंबर) मुसळधार पावसाने झोडपले.

Gangappa Pujari

New York Rain News:

सध्या जगभरात पावसाने थैमान घातले असून विविध शहरांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराला शुक्रवारी (२९, सप्टेंबर) मुसळधार पावसाने झोडपले. या मुसळधार पावसामुळे महामार्ग आणि घरे पाण्याखाली गेली. शहरातील पुरस्थितीमुळे जनजीवन विस्कळित झाले असून लोक गाड्या, घरांमध्ये अडकून पडले.

न्यूयॉर्कमध्ये पावसाचा हाहाकार....

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जगातील सर्वात आधुनिक शहरांपैकी एक असलेले न्यूयॉर्क शहराला पावसाचा तडाखा बसला. शुक्रवारी पावसाने न्यूयॉर्कला पूर आला. त्यामुळे रेल्वे मार्ग विस्कळीत झाला. तसेत रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकही महामार्गावर गाड्यामध्येच अडकून पडले.

पावसाचा जोर पाहून लागार्डिया विमानतळावरील एक टर्मिनल काही तास बंद ठेवावे लागले. शहरातीस पुरस्थिती पाहून पाहून न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी आणीबाणी जाहीर केली. आहे. तसेच नागरिकांना बाहेर न पडण्याच्याही सुचना देण्यात आल्या आहेत.

रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक धोके निर्माण झाले असून शहराच्या महापौरांनी लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. महापौरांच्या म्हणण्यानुसार शहरात फिरणेही कठीण झाले आहे. त्यामुळे जर तुम्ही घरी असाल तर घरीच रहा आणि जर तुम्ही कामावर किंवा शाळेत असाल तर तिथेच सुरक्षित निवारा शोधा.. असा सुचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.

विमान उड्डाणे रद्द...

लागार्डिया विमानतळावरील इंधन क्षेत्र आणि आजूबाजूचे रस्ते जलमय झाले आहेत आणि किमान 259 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत आणि जॉन एफ केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर किमान 94 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत....

धडकी भरवणारा व्हिडिओ समोर...

दरम्यान, न्यूयॉर्कमधील या पावसाचे धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये शहरातील रस्ते, घरे पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे. या पावसामुळे जनजीवन पुर्णपणे विस्कळित झाले असून लोकांनी मिळेल तिथे आसरा शोधला आहे. दरम्यान, सध्या पावसाचा जोर कमी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजाभवानी मंदिरात परिसरात हाणामारीची घटना

Turmeric Bath Benefits: हळदीच्या पाण्याने आंघोळ करा, त्वचेचे इन्फेक्शन, खाज आणि मुरुम होतील कमी

Satara Accident: अंबाबाईच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, कारला ट्रकची जोरदार धडक, चौघांचा जागीच मृत्यू

MHADA Lottery : घरं घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी; म्हाडाने वाढवली अर्ज करण्याची मुदत; शेवटची तारीख काय? वाचा

Tiger Shroff : टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरणात नवा खुलासा; शूटर्सच्या निशाण्यावर होता सलमान खान, पण...

SCROLL FOR NEXT