Heat Wave Alert saam tv
देश विदेश

Heat Wave Alert : यंदा उन्हाळा भयंकर तापणार, जीवही गमवावा लागू शकतो; अजिबात हलक्यात घेऊ नका केंद्राचा इशारा

Weather Forecast : हवामान खात्याच्या या इशाऱ्यानंतर आरोग्य मंत्रालयानेही लोकांना उन्हात बाहेर पडण्यापूर्वी सतर्क राहण्याचा आणि सर्व प्रकारची खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

Chandrakant Jagtap

IMD Weather Alert: यंदा फेब्रुवारीतच कडाक्याच्या उन्हामुळे लोक त्रस्त असताना भारतीय हवामानशास्त्र विभागाने आणखी चिंता वाढवणारा इशारा दिला आहे. आयएमडीच्या ताज्या इशाऱ्याने उन्हाळ्यातील भीषण स्थिती दर्शविली आहे. मार्च महिन्यातच उन्हाळ्यातील तापमान 42 अंशांपर्यंत वाढू शकते असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. हे तापमान मार्च महिन्याच्या सामान्यपेक्षा कित्येक अंशांनी जास्त आहे.

मार्च महिन्यात उत्तर भारतात तीव्र उष्णतेची लाट आणि उष्णतेच्या लाटेचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे जीवही गमवावा लागू शकतो असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याच्या या इशाऱ्यानंतर आरोग्य मंत्रालयानेही लोकांना उन्हात बाहेर पडण्यापूर्वी सतर्क राहण्याचा आणि सर्व प्रकारची खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

फेब्रुवारी महिन्यातच उच्चांकी तापमान

यंदा फेब्रुवारी महिन्यात उष्णतेचा पारा चांगलाच चढलेला होता. फेब्रुवारी महिन्यात सरासरी दिवसाचे तापमान २९.५ अंश नोंदवले गेले. विशेष म्हणजे हे तापमान 1901 नंतर म्हणजेच 122 वर्षांतील सर्वोच्च आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्याचा कडाका चांगलाच वाढणार असल्याचे संकेत आधीच मिळाले होते. आता हवामान खात्यानेही त्याला दुजोरा दिला आहे. (Latest Marathi News)

आरोग्य मंत्रालयानेही दिला सल्ला

उष्णतेच्या लाटेमुळे हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होते, त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हृदयाच्या रुग्णांना आपली नियमित तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय लोकांनी उन्हात बाहेर पडताना तोंड आणि डोके कपड्याने झाकण्याचा आणि उष्माघात टाळण्यासाठी पुरेसे पाणी आणि इतर द्रवपदार्थांचे खाण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. (Weather Forecast)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

Maharashtra Rain Live News: खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग; पुण्यातील टिळक पूल वाहतुकीसाठी बंद

Parliament: अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल, लोकसभेत नेमकं काय घडलं?

Online Gaming Ban Bill : ऑनलाइन गेम खेळणं बंद होणार? केंद्राचं विधेयक, ऑनलाईन गेम 'ओव्हर'

SCROLL FOR NEXT