Pune News : रवींद्र धंगेकरांच्या कार्यकर्त्याचा नादच खुळा; विजयानंतर दिली भन्नाट ऑफर

Pune News : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. या निवडणुकीत धंगेकर यांनीा 11 हजार मतांनी विजय मिळवाला.
MLA Ravindra Dhangekar
MLA Ravindra Dhangekarsaam tv
Published On

>>सचिन जाधव

Pune News : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असेलल्या पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी जबरदस्त विजय नोंदवला आहे. या विजयानंतर आता धंगेकरांच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. या विजयानंतर धंगेकरांच्या एका व्यवसायिक कार्यकर्त्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भन्नाट ऑफर दिली आहे.

नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर जिंकल्याबद्दल पुण्यातील एका हॉटेल व्यवसायिकाने 'एका रोलवर एक रोल फ्री' अशी ऑफर दिली आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत असणाऱ्या एका हॉटेल व्यवसायिकाने ही भन्नाट ऑफर दिली आहे. पुण्यात सध्या या ऑफरची जोरदार सध्या चर्चा सुरू आहे. ही ऑफर २ दिवसांसाठी असून सोशल मीडियावर या ऑफरची जोरदार चर्चा सुरू आहे.

MLA Ravindra Dhangekar
Karnataka BJP MLA: भाजप आमदार निवडणुकीच्या तोंडावर 'आपटला'; लाचखोरीच्या आरोपानंतर राजीनामा देऊन झाला फरार

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. या निवडणुकीत धंगेकर यांनीा 11 हजार मतांनी विजय मिळवाला. त्यांनी तब्बल 28 वर्षांनी कसब्यात भाजपा उमेदवाराचा पराभव केला आहे. या विजयानंतर धंगेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून कार्यकर्ते आणि जनेतेचे आभार मानले आहेत. (Latest Marathi News)

MLA Ravindra Dhangekar
Crime News : तो म्हणे ‘करो प्यार’, तिचा होता नकार ! सहा महिने तिच्यावर झाला अत्याचार, अखेर...

धंगेकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, 'मायबाप जनतेचे मनःपुर्वक आभार! हा विजय तुमचा आहे, हा विजय आपला आहे!' या विजयानंतर रवींद्र धंगेकर यांच्यावर मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (Pune News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com