Rescue teams search the Ganga river after a tragic drowning incident during a ritual in Ballia, Uttar Pradesh. saam tv
देश विदेश

हृदयद्रावक! दशक्रियाविधी वेळी मुंडन करताना गंगा नदीत ६ जण बुडाले, ४ जणांचा मृत्यू

Six People Drowned In Ganga River : उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील गंगा नदीत ६ जण बुडाल्याची घटना घडली आहे. दशक्रिया विधीवेळी मुंडन करताना ६ जण बुडाले आहेत.

Bharat Jadhav

  • बलियामध्ये गंगा नदीत भीषण दुर्घटना

  • दशक्रिया विधीदरम्यान ६ जण बुडाले

  • ४ जणांचा मृत्यू, २ जण बचावले

उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली. दशक्रियाविधी वेळी मुंडन करताना ६ जण गंगा नदीत बुडाल्याची घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर दोघांना वाचवण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्याचे निर्देश दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुखद घटना फेफाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याणीपूर येथे घडली. येथील रहिवासी वशिष्ठ चौहान यांचे कुटुंबीय दशक्रिया विधी करण्यासाठी गंगा नदीच्या किनारी गेले होते. त्यावेळी मुंडन करताना ही घटना घडली. चौहान यांचे संपूर्ण कुटुंब आणि नातेवाईक बलिया शहरातील कोतवाली परिसरातील शिवरामपूर घाट येथे दशक्रियेसाठी जमले होते.

धार्मिक विधींदरम्यान लोक गंगा नदीत स्नान करत होते त्यावेळी चार मुली अचानक खोल पाण्यात गेल्या आणि बुडू लागल्या. जवळच असलेले दोन तरुण त्यांना वाचवण्यासाठी नदीत उतरले, पण पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तेही पाण्यात बुडून मरण पावले.

एका तरुणीला आणि एका तरुणाला वाचवण्यात यश

घाटावरील लोकांनी तात्काळ प्रतिसाद देत एका तरुणीला आणि एका तरुणाला वाचवले. परंतु इतर चार जण बेपत्ता होते. माहिती मिळताच, स्थानिक पोलीस आणि पाणबुड्यांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनंतर एनडीआरएफ (NDRF) येण्यापूर्वी स्थानिक डायव्हर्सनी नदीतून चार मृतदेह बाहेर काढले.

गडवार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामपूर भोज येथील रहिवासी हर्षिता (१७) आणि नंदिता (१२) अशी पटली आहे. या अपघातात महेशपूरचे रहिवासी असलेले अर्जुन चौहान (१९) आणि गाझीपूर जिल्ह्यातील खेळाडू अरुण चौहान (२०) अशी मृतांची ओळख पटली आहे.

या दुर्घटनेची माहिती मिळताच बलियाचे जिल्हाधिकारी (डीएम) आणि पोलीस अधीक्षक (एसपी) परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे आणि जखमींवर मोफत व योग्य उपचार देण्याचे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या अपघातामुळे नदीकिनारी असलेल्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT