Health Budget 2022: आरोग्यसेवा डिजिटल करण्यावर भर- अर्थमंत्री nirmala sitharaman म्हणाल्या Saam Tv
देश विदेश

Health Budget 2022: आरोग्यसेवा डिजिटल करण्यावर भर- अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या

कोरोना महामारीमुळे आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: गेल्या २ वर्षापासून कोरोना महामारीने देशात थैमान घातले आहे. कोरोना महामारीमुळे आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामध्ये विशेष म्हणजे लोकांच्या मानसिक स्थितीवर वाईट प्रभाव पडला आहे. यामुळे पुढील काळात देशात मानसिक आरोग्य कार्यक्रम लॉन्च करण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये केली आहे.

हे देखील पहा-

संसदेमध्ये देशाचा अर्थसंकल्प मांडताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टमकरिता एक डिजिटल प्लॅटफॉर्म बनवण्यात येणार आहे. ज्यामध्ये आरोग्य सुविधा, यूनिक हेल्थ आयडेंटिटी, कंसेट फ्रेमवर्कसह डिजिटल रजिस्ट्री करण्यात येणार आहे. आरोग्य सुविधेकरिता यूनिवर्सल एक्सेस देण्यात येणार आहे. आरोग्य सेवा डिजिटल करण्यावर भर दिला जाणार आहे. गेल्या २ वर्षामध्ये आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाण विकास झाला आहे असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

बाकीच्या देशामध्ये जीडीपीच्या १० ते १५ टक्के आरोग्यावर खर्च केले जाणार आहेत. त्याच्या तुलनेत आपल्या देशामध्ये आकडा खूपच कमी आहे. देशात आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीकोनातून एकूण जीडीपीच्या ५ टक्के आरोग्य सुविधांवर खर्च करायला पाहिजे. ज्यामध्ये देशात आरोग्य यंत्रणा वाढवले जाणार आहे. देशामध्ये जास्तीत- जास्त रुग्णालय उभारले जाणार आहेत. त्याबरोबरच आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांचीही संख्या वाढवायला हवी असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ayodhya Ram Temple: राम मंदिरातून दररोज ६ ते ८ लाखांची चोरी; पैसा नेमका कुठे जात होता?

Low Heart Rate: लो हार्ट रेटमुळे ब्लड प्रेशरही कमी होऊ शकतो का? ही लक्षणं अजिबात दुर्लक्षित करू नका

Maharashtra News Live Update: बदलापूरचा कोंडेश्वर धबधबा प्रवाहित; पर्यटकांची मोठी गर्दी

Face Care: चाळीशीतही २० वर्षांच्या मुलीसारखा गुलाबी ग्लो पाहिजे? मग फेसवॉश नव्हे, वापरा 'ही' घरगुती सामग्री

काळाचा घाला! रस्ता ओलांडताना भरधाव कारने चिरडले; ७ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT