Corona Variant JN.1 Cases Saam Digital
देश विदेश

Corona Cases Update : कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

corona virus New Variant Covid 19 JN.1 : बुधवारी एकूण ६ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. केरळमध्ये ३, कर्नाटकात २ आणि पंजाबमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.

प्रविण वाकचौरे

Corona Cases Update :

कोरोना व्हायरसच्या नव्या JN.1 व्हेरिएंटने चिंता वाढली आहे. कोरोना रुग्णसंख्येत मागील काही दिवसात मोठी वाढ झाली आहे. मागील २४ तासात भारतात ६४० रुग्णांचा नोंद झाली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात अॅक्टिव्ह रुग्णांचा संख्या ३०००च्या जवळपास आहे.

देशभरात ६४० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २६६९ वरून २९९७ वर पोहोचली आहे. देशातील आतापर्यंतची कोविड-१९ रुग्णांची संख्या आता ४.५० कोटींच्या पुढे गेली आहे. केरळमध्ये आणखी एका मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंतच्या मृतांची संख्या ५,३३,३२८ वर पोहोचली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बुधवारी ६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद

देशभरात बुधवारी एकूण ६ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. केरळमध्ये ३, कर्नाटकात २ आणि पंजाबमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. तर ५९४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद बुधवारी झाली होती. (Latest Marathi News)

मुंबई महापालिकादेखील सज्ज

मुंबईत देखील कोरोनाच्या रुग्णामध्ये झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्भूमीवर मुंबई महापालिका अलर्ट मोडवर आहे. मुंबईत डिसेंबरमध्ये आतापर्यंत आढळलेल्या सर्व 34 बाधितांची 'जिनोम सिक्वेन्सिंग' करण्यात येणार आहे.खबरदारी म्हणून 16 महापालिका रुग्णालये, सेव्हन हिल्स रुग्णालयासह सुमारे साडेपाच हजार बेड तैनात ठेवण्यात येणार आहेत.

मुंबई महापालिकेची बेड व्यवस्था

आयसोलेशन - 1276

ऑक्सिजन - 1108

आयसीयू - 441

व्हेंटिलेटर - 470

एकूण - 3295

सेव्हन हिल्स रुग्णालय

आयसोलेशन - 910

ऑक्सिजन - 620

आयसीयू - 320

व्हेंटिलेटर - 360

एकूण - 2210

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT