HDFC Bank Canva
देश विदेश

HDFC Bank-HDFC Limited Merger: एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेडचे 1 जुलैला विलनीकर, ग्राहकांवर काय होणार परिणाम?

Latest Banking News: एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेची बोर्ड मिटिंग 30 जून रोजी होणार आहे.

Priya More

HDFC Bank: देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसीचे (HDFC Bank) लवकरच विलनीकरण होणार आहे. एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि एचडीएफसी लिमिटेड (HDFC Limited) यांचे विलीनीकरण येत्या 1 जुलै 2023 पासून लागू होईल. एचडीएफसी समूहाचे अध्यक्ष दीपक पारीख यांनी मंगळवारी ही घोषणा केली आहे. यासंदर्भात एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेची बोर्ड मिटिंग 30 जून रोजी होणार आहे.

या तारखेला शेअर्सचे ट्रेडिंग थांबेल

एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड या दोन्ही बँकांच्या संचालक मंडळांची शेवटची बैठक येत्या 30 जून रोजी होणार आहे. एचडीएफसी बँकेचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण होण्यापूर्वी हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या बोर्डाची ही शेवटची बैठक असेल. दीपक पारीख यांनी सांगितले की, येत्या 13 जुलै रोजी गृहनिर्माण वित्त कंपनी एचडीएफसीचे शेअर स्टॉक एक्स्चेंजमधून डिलिस्ट केले जातील आणि 14 जुलैपासून एचडीएफसीच्या शेअर्समधील ट्रेडिंग थांबेल.

एचडीएफसीकडे येणार इतके शेअर्स

दीपक पारीख यांनी सांगितले की, 30 जून रोजी मार्केट बंद झाल्यानंतर दोन्ही वित्तीय संस्थांची बोर्ड मिटिंग होईल. ज्यामध्ये विलीनीकरणास मान्यता दिली जाईल. एचडीएफसीचे उपाध्यक्ष आणि सीईओ केकी मिस्त्री यांनी सांगितले की, एचडीएफसी शेअर्सचे डिलिस्टिंग 13 जुलैपासून प्रभावी मानले जाईल. विलीनीकरण लागू झाल्यानंतर नियमांनुसार, HDFC च्या भागधारकांना प्रत्येक 25 समभागांमागे एचडीएफसी बँकेचे 42 शेअर्स मिळतील.

दुसऱ्या नंबरची कंपनी

एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीच्या विलीनीकरणानंतर, नवीन कंपनी बाजार भांडवलाच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर देशातील दुसरी कंपनी असेल. रिलायन्स इंडस्ट्रीज 16, 83, 950 कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह पहिल्या क्रमांकावर आहे. 27 जून रोजी जर एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेडचे मार्केट कॅप जोडले तर टीसीएस मागे पडेल आणि 14, 45, 958 कोटी रुपयांसह दुसऱ्या स्थानावर येईल.

आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार

एचडीएफसी बँकेमध्ये एचडीएफसी लिमिटेडचे ​​विलीनीकरण हा भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक व्यवहार असल्याचे मानले जात आहे. एचडीएफसी लिमिटेडचे ​​एचडीएफसी बँकेत विलीनीकरणचा घोषणा मागच्या वर्षी 4 एप्रिल रोजी करण्यात आली होती. डीलचे मूल्य सुमारे $40 अब्ज इतके असेल. ज्यामुळे हा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार होईल. या विलीनीकरणानंतर नवीन संस्थेकडे सुमारे 18 लाख कोटींची मालमत्ता असेल.

ग्राहकांवर होणार परिणाम?

या विलीनीकरणाचा ग्राहकांना खूप फायदा होणार आहे. कारण या विलीनीकरणानंतर बँकेच्या भांडवलात पूर्वीच्या तुलनेत लक्षणीय वाढ होणार आहे. या विलनीकरणानंतर बँक पूर्वीपेक्षा अधिक जोखमीचे कर्ज देऊ शकणार आहे. यासोबतच सध्या लोकांना एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेच्या सेवा घेण्यासाठी वेगवेगळ्या शाखांमध्ये जावे लागत होते. पण आता एकाच शाखेत जाऊन तुमचे काम होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

SCROLL FOR NEXT