Karnataka Obscene Video Scandal HD Revanna Bail  ANI
देश विदेश

HD Revanna Bail: अश्लील व्हिडीओ प्रकरण; एच.डी.रेवण्णा यांना अपहरण प्रकरणात जामीन

Karnataka Obscene Video Scandal: कर्नाटकातील कथित अश्लील व्हिडिओ प्रकरणातील संशयित आरोपी जनता दल सेक्युलरचे आमदार एचडी रेवन्ना यांना दिलासा मिळालाय. सोमवारी विशेष न्यायालयाने कथित अपहरण प्रकरणात जामीन मंजूर केलाय. पाच लाखांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मिळाली आहे.

Bharat Jadhav

कर्नाटक : कर्नाटकातील कथित अश्लील व्हिडिओ प्रकरणातील संशयित आरोपी जनता दल सेक्युलरचे आमदार एचडी रेवन्ना यांना दिलासा मिळालाय. सोमवारी विशेष न्यायालयाने कथित अपहरण प्रकरणात जामीन मंजूर केलाय. पाच लाखांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मिळाली आहे.

एच.डी. रेवन्ना यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळल्यानंतर ४ मे रोजी अटक करण्यात आली होती. विशेष न्यायालयाने साक्षीदार आणि पुराव्यांशी छेडछाड न करण्याच्या अटीवरच एचडी रेवन्ना यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. तसेच जामीनादरम्यान त्यांना एसआयटी टीमच्या संपर्कात राहावे लागेल, असे निर्देशही न्यायालयाने दिलेत. कर्नाटक सरकारने कथित अश्लील व्हिडिओ कांड प्रकरणी विशेष तपास पथक तयार केलं होतं.

या पथकाने ९ मे रोजी विशेष न्यायालयात सांगितलं की, प्रज्वल रेवन्नाने ज्या महिलेवर लैंगिक अत्याचार केलेत त्या महिलेचं अपहरण एचडी रेवन्नाच्या इशाऱ्यावरुनच करण्यात आलं होतं. एचडी रेवन्ना हे कर्नाटकातील कथित अश्लील व्हिडिओ घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी प्रज्वल रेवन्नाचे वडील आहेत. प्रज्वल हासन हे खासदार असून ते या प्रकरणात फरार आहेत. तर रेवन्ना यांना ५ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे महानगरपालिकेकडून आंदेकरांच्या वारकरी भवन वर कारवाई

Amla Pickle Recipe: घरच्या घरी बनवा आवळ्याचं आंबट गोड लोणचं, सर्वजण चाटून पुसून खातील

Delhi car Blast Live updates : हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही, मोदींचा इशारा

Priyadarshini Indalkar: अभिनेत्रीचा बोल्ड लूक, डिपनेक लेहेंग्यात खुललं प्रियदर्शनीचं सौंदर्य

GK : 1000 व्ह्यूजमागे Youtube किती पैसे मिळतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT