Hasan Mushrif in Kagal Kolhapur News, Vidhansabha Nivadnuk nikal 2023 SAAM TV
देश विदेश

Hasan Mushrif On Vidhan Sabha Result : मागच्या वेळी भाजपचा पराभव झाला होता, यंदाचा विजय हा आमचा राष्ट्रवादीचा पायगुण : हसन मुश्रीफ

Nandkumar Joshi

रणजित मांजगावकर, कोल्हापूर | ३ डिसेंबर, २०२३

Hasan Mushrif On Vidhan Sabha Nivadnuk Result Today :

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांची आज, रविवारी मतमोजणी सुरू आहे. जवळपास सर्वच राज्यांच्या निवडणूक निकालाचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. तर छत्तीसगडमध्येही भाजपने काँग्रेसला मागे टाकले आहे. भाजपच्या यशाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी वेगळाच दावा केला आहे. हा आमचा राष्ट्रवादीचा पायगुण असावा, असे मुश्रीफ म्हणाले. (2023 rajasthan legislative assembly election)

तेलंगणात (2023 telangana legislative assembly election) काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारत बीआरएलला धक्का दिला आहे. निवडणूक निकालाचे सुरुवातीचे कल बघता, भाजपने तीन राज्यांत काँग्रेसला धक्का देत विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मंत्री आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी दावा केला आहे. भाजपचा यावेळचा विजय हा आमचा राष्ट्रवादीचा पायगुण असावा, असे ते म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेमके काय म्हणाले हसन मुश्रीफ?

चार राज्यांच्या निवडणूक निकालावर (assembly election results 2023) राज्याचे मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तेलंगणा सोडलं तर इतर राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारलेली आहे. मागच्या वेळी या राज्यांमध्ये भाजपचा पराभव झाला होता. यंदाचा हा विजय म्हणजे बहुतेक हा आमचा राष्ट्रवादीचा पायगुण ठरला असावा, असे मुश्रीफ म्हणाले.

निवडणूक निकालाचे सुरुवातीचे कल

मध्य प्रदेश - १५६ जागांवर भाजपची आघाडी, काँग्रेस ७१ मतदारसंघात आघाडीवर

राजस्थान - भाजप - १२१ आणि काँग्रेसची ६३ जागांवर आघाडी

छत्तीसगड - भाजप ५५ आणि काँग्रेस ३२ जागांवर आघाडीवर

तेलंगणा - बीआरएस ३७, काँग्रेस ६९ आणि भाजप ९ जागांवर आघाडीवर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT