50 Students Receive Obscene Texts from Professors Saam
देश विदेश

'सर्वांना वाटतंय तू Virgin नाहीस', 50 विद्यार्थिनींना Whatsapp वर मेसेज, अश्लील चॅट व्हायरल, ३ प्रोफेसर निलंबित

50 Students Receive Obscene Texts from Professors: हरियाणाच्या जिंद विद्यापीठात तीन प्राध्यापकांवर विद्यार्थिनींना अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप. व्हॉट्सअॅप चॅट्स व्हायरल.

Bhagyashree Kamble

हरियाणातील जिंद येथील चौधरी रणबीर सिंह विद्यापीठात विद्यार्थिनींना अश्लील व्हॉट्सअॅप संदेश पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणी विद्यापीठातील प्राध्यपकांवर गंभीर आरोप करण्यात आले आहे. दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ कारवाई करत तीन प्राध्यपकांना निलंबित केले आहे. या घटनेशी संबंधित व्हॉट्सअॅप चॅट्स समोर आल्यानंतर विद्यार्थिनींनी अलिकडेच कॅम्पसमध्ये जोरदार निदर्शने केली.

विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सांगितले की, '२७ नोव्हेंबर रोजी त्यांना एक तक्रार मिळाली. एक निनावी पत्र होतं. त्या पत्रात प्राध्यपकाने व्हॉट्सअॅपद्वारे अश्लील संदेश पाठवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला'. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी समितीनं चौकशी केली. नंतर प्राध्यपकांना रिलीव्ह केले. कुलगुरूंनी सांगितले की, 'कोणतीही तक्रार आल्यावर कठोर कारवाई केली जाते. तसेच पोलिसांनाही याची माहिती देण्यात येते', असं त्यांनी सांगितलं.

या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू आहे. लवकरच अंतिम अहवाल सादर केला जाईल, असंही कुलगुरू डॉ. रामपाल सैनी यांनी सांगितलं. मेसेजमध्ये प्रोफेसर विद्यार्थिनीला म्हणतात, 'सर्वांना वाटते की तू वर्जिन नाहीस'. 'जर तुझ्या बॉयफ्रेंडने परवानगी दिली नाही तर, तुला त्रास देऊ शकतो का?', असं प्राध्यपकाने विचारलं. असे अनेत मेसेज प्रोफेसरने विचारले.

या प्रकरणात जवळपास ५० विद्यार्थिनींना प्राध्यपकाने अश्लील मेसेज पाठवले असल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकऱणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT