Haryana Building collapsed ANI
देश विदेश

Haryana Building collapsed: हरियाणात तीन मजली इमारत कोसळून 4 ठार, काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

हरियाणातून मोठं वृत्त हाती आलं आहे. हरियाणात भात गिरणीची तीन इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Vishal Gangurde

Haryana News: हरियाणातून मोठं वृत्त हाती आलं आहे. हरियाणात भात गिरणीची तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० जण जखमी झाले आहेत. या गिरणी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणामधील करनालमध्ये मंगळवारी रात्री भात गिरणी कोसळल्याची घटना घडली. या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस दल , अग्निशामक दल, पोलीस, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत. पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी मदत कार्य सुरू केलं आहे.

नेमकं काय घडलं?

हरियाणातील करनाल येथे ही तीन मजली भात गिरणी होती. शिव शक्ति भात गिरणी असे नाव आहे. या गिरणीत काही कामगार आराम करत होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 4 जणांचा मृ्त्यू झाला आहे. तर या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली १०० हून अधिक लोकांना बाहेर काढल्याची माहिती हाती आली आहे.

पोलीस अधिकारी शंशाक कुमार यांनी सांगितले की, 'ही घटना दुर्दैवी आहे. या प्रकरणी कारवाई करण्यात येईल. आम्ही घटनास्थळी पोहोचत आहोत. या ठिकाणी डॉक्टर, एनडीआरएफ, एसडीआरएफची टीम देखील पोहोचली आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत २० जण जखमी झाले असून तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. मलबा हटविण्याचं काम सुरू आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shilpa Shetty: 'परी म्हणू की सुंदरा...' शिल्पा शेट्टीचा स्टायलिश अंदाज

Sindhudurg : विवाहितेची आत्महत्या, पतीसह माजी नगराध्यक्षाच्या विरोधात तक्रार; ठाकरे गटाचे नेते पोलीस स्टेशनवर धडकले

Jasprit Bumrah: लॉर्ड्सच्या मैदानावर जसप्रीत बुमराहचा 'पंचबळी'; ऑनर बोर्डवर कोरलं जाणार नाव!

Maharashtra Live News Update : बदनामी थांबवा! पडळकर एफ सी रोड वर या

Nagpur News: नागपूरच्या पबमध्ये टेबलच्या वादातून राडा; तरुणाला बेदम मारहाण | VIDEO

SCROLL FOR NEXT