Haryana Bus Fire Saam TV
देश विदेश

Haryana Bus Fire : देवदर्शनाहून परतताना भाविकांच्या खासगी बसला भीषण आग; ८ जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी

Haryana Bus Fire News : भाविकांना दर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या खासगी बसला अचानक आग लागली. या आगीत ८ भाविकांचा होरपळून मृत्यू झाला. तर डझनभर भाविक जखमी झाले.

Satish Daud

हरियाणाच्या नुहमध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. देवदर्शनाहून परतताना भाविकांच्या खासगी बसला भीषण आग लागली. या आगीत ८ भाविकांचा होरपळून मृत्यू झाला. तर डझनभर भाविक जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

अपघातातील मृत हे पंजाब आणि चंदीगड येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त मथुरा आणि वृंदावनला देवदर्शनाला गेली होती.

या बसमधून जवळपास ६० भाविक प्रवास करीत होते. हे सर्वच भाविक एकमेकांचे नातेवाईक होते. दरम्यान, देवदर्शनाहून परतत असताना कुंडली मानेसर पलवल द्रुतगती मार्गावर धावत्या बसला अचानक आग लागली. बघता-बघता संपूर्ण बस आगीच्या विळख्यात सापडली.

जीव वाचवण्यासाठी काही भाविकांनी धावत्या बसमधून बाहेर उड्या घेतल्या. बसला लागलेली आग स्थानिकांनी विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहींना बाहेर पडता न आल्याने त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या घटनेत आतापर्यंत ८ भाविकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीचे कारण अस्पष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai To Rajgad Travel: मुंबईपासून राजगड किल्ल्यापर्यंत प्रवास कसा करावा? ट्रेकिंग आणि ट्रॅव्हल टिप्स जाणून घ्या

Maharashtra Live News Update: नवापूर तालुक्यातील खडकी आश्रम शाळेत एका सहा वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

Maharashtra Rain: परतीच्या पावसाचा हाहाकार! आज पश्चिम महाराष्ट्राला झोडपणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Udgir Fort History: मध्ययुगीन युद्धभूमी आणि भव्य संरचना, उदगीर किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

SCROLL FOR NEXT