Haryana News Saam Tv
देश विदेश

हरियाणात मोठी दुर्घटना! गणेश विसर्जनावेळी पाण्यात बुडून ६ जणांचा मृत्यू; अनेकांना रुग्णालयात केले दाखल

गणपती विसर्जनादरम्यान हरियाणातील महेंद्रगड आणि सोनीपतमध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : अनंत चतुर्दशी दिवशी शुक्रवारी देशभरात गणपती विसर्जनाच्या भव्य मिरवणुकांचे तसेच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान एकीकडे आनंदाच्या बातम्या तर दसरीकडे हरियाणातून (Haryana ) दु:खद बातमी समोर आली आहे. हरियाणात गणपती विसर्जनावेळी 6 जणांचा मृत्यू (Death) झाला. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही या अपघातांबद्दल शोक व्यक्त करत कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन दिले आहे.

हरियाणातील(Haryana ) महेंद्रगडमध्ये गणपती विसर्जनाच्यावेळी कालव्यात 4 जण बुडाले, तर सोनीपतमध्ये यमुना नदीत 2 जण बुडाले. 4 जणांना मृत अवस्थेत रुग्णालयात दाखल केले होते. महेंद्रगडमधील कालव्यात गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान विजेचा धक्का लागून ९ जण वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. आता जिल्हा प्रशासन एनडीआरएफच्या टीमच्या सहकार्याने बचाव मोहीम राबवत आहे. काही जणांना वाचवण्यात यश आले आहे.

मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. 'गणपती विसर्जनावेळी झालेल्या या अकाली मृत्यूची घटना अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. अशा कठीण काळात आम्ही या लोकांच्या कुटुंबियांसोबत आहोत. अनेकांना बुडण्यापासून वाचवून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,' असं ट्विट मुख्यमंत्री खट्टर यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:भिवंडी इमारत दुर्घटना; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी पाहणी, महापालिका आयुक्तांना तातडीच्या कारवाईचे आदेश

Bhiwandi : भिवंडीत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ४ मजली इमारत कोसळली, ९ जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

PM Modi: पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह विधान, २५ वर्षांच्या तरुणीविरोधात गुन्हा; नेमकं प्रकरण काय?

श्रावण महिन्यात दही आणि कढी का खात नाहीत? काय आहे त्यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण?

Girl Child Scheme : राज्य सरकारचा मुलींसाठी खास उपक्रम, गरजू कुटुंबातील मुलींना मिळणार आर्थिक आधार

SCROLL FOR NEXT