Prime Minister Narendra Modi has urged citizens to save petrol and diesel, avoid buying gold 
देश विदेश

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

PM Modi Meets 48 Haryana BJP MLAs : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील सर्व ४८ भाजप आमदारांची दिल्लीत बैठक घेतली. जनकल्याण, सरकारची कामगिरी आणि संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा झाली असून पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या तयारीलाही वेग आल्याचे वृत्त आहे

Bharat Jadhav

आगामी काळात पाच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडींनं रणनीती आखलीय. दुसरीकडे या राज्यांमध्ये आपली सत्ता आणण्यासाठी भाजपनेही मोठी तयारी सुरू केलीय. त्यापार्श्वभूमीवर प्रत्येक राज्यातील आमदारांवर नवंनवीन मिशन देत आहे. हरियाणातील ४८ आमदारांनाकडे पीएम मोदींनी नवी मिशनची जबाबदारी दिलीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हरियाणातील भाजप आमदारांशी बैठक घेतली. या बैठकीत सोशल मीडियाचा वापर आणि सेंद्रिय शेती यांसारख्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच जुन्या आठवणींनाही उजाळा देण्यात आला. मात्र, या बैठकीतून आणखी एक महत्त्वाचा संदेश देण्यात आलाय. भाजपने आपलं लक्ष आता पंजाबमधील निवडणुकांवर केंद्रित केलंय. सूत्रांच्या माहितीनुसार, हरियाणातील भाजपचे बहुतांश आमदार पंजाबमधील प्रचार मोहिमेची धुरा सांभाळू शकतात.

हरियाणातील भाजप आमदार पंजाबमध्ये करणार प्रचार

सूत्रांच्या माहितीनुसार, हरियाणातील भाजपचे बहुतांश आमदार आणि नेत्यांना पंजाबमध्ये तैनात केले जाऊ शकते. त्यांना विविध विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवली जाण्याची तसेच बूथ स्तरावरील कामेही दिली जाण्याची शक्यता आहे. पंजाबमधील मतदारांसमोर हरियाणातील 'गव्हर्नन्स मॉडेल' (प्रशासकीय कार्यपद्धती) सादर करण्याची तयारी भाजप करत आहे. या रणनीतीचाच एक भाग म्हणून, मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी या राज्याच्या वारंवार भेटी देण्यास आधीच सुरुवात केली आहे.

गेल्या वर्षभरात नायब सिंग सैनी यांनी पंजाबमधील सुमारे ९० कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतलाय. २०२७ च्या निवडणुकांपूर्वी पंजाबमध्ये भाजपचा जनसंपर्क वाढवण्याच्या मोहिमेचे ते नेतृत्व करत आहेत. पंजाबमध्ये सैनी एका वेगळ्याच रूपातही दिसून आले होते. त्यांनी तिथे पगडी परिधान करत विविध धार्मिक स्थळांना भेटीही दिल्या आहेत.

पंजाब भाजपमध्ये त्यांना अनेकदा 'सरदार नायब सिंग सैनी' असे संबोधले जाते. पंजाबमध्ये भाजपचे सरकार स्थापन करण्याबाबत नायब सिंग सैनी यांनी अलीकडेच एक ठाम विधान केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'विकसित भारत' या संकल्पनेच्या धर्तीवर 'विकसित पंजाब' घडवण्याचे प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. तसेच, हरियाणामधील कल्याणकारी योजना पंजाबमध्येही राबवल्या जातील, असेही सैनी यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

SCROLL FOR NEXT