Jammu Kashmir and Haryana Assembly Election Result 2024 Live Updates Jammu Kashmir and Haryana Assembly Election Result 2024 Live Updates
देश विदेश

Haryana Election Results 2024 Live: निवडणूक आयोगाने काँग्रेसचे आरोप फेटाळले

Jammu Kashmir and Haryana Assembly Election Result 2024 Live Updates : आजच्या ठळक बातम्या, जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांचे लाईव्ह अपडेट्स तसेच महाराष्ट्रातील ताजा घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Satish Daud

Haryana Election Results 2024 Live: निवडणूक आयोगाने काँग्रेसचे आरोप फेटाळले

Assembly Election Results 2024 LIVE: हरियाणा आणि जम्मू-काश्मीर निवडणुकांमध्ये निकाल अपडेट बाबत होणाऱ्या विलंबाबाबत काँग्रेसच्या आरोपांना निवडणूक आयोगाने दिलं उत्तर

मतदानाची मोजणी निवडणूक नियमांच्या नियम 60 नुसार नियोजित केंद्रांवर अधिकाऱ्यांद्वारे केली जात आहे - ECI

प्रत्येक पाच मिनिटांत सुमारे २५ फेऱ्यांचे अपडेट केले जात आहे, त्यामुळे काँग्रेसने व्यक्त केलेली चिंता निराधार ठरते - ECI

काँग्रेसचे आरोप निराधार आहेत आणि कोणत्याही मतदारसंघात विलंबाची नोंद झालेली नाही, त्यांनी कुठलेही पुरावे दिलेले नाहीत - ECI

जम्मू-काश्मीरमध्ये आम आदमी पक्षाने विजयाचं खातं उघडलं. आम आदमी पक्षाने डोडा विधानसभा मतदारसंघ जिंकला.

Haryana Election Results 2024 Live:  विनेश फोगाटची मुसंडी, मोठी आघाडी घेतली, विजयाकडे वाटचाल

Haryana Election Results 2024 Live: विनेश फोगाट पिछाडीवर

Haryana Election Results 2024 Live: हरियाणामध्ये आम्ही सरकार स्थापन करु

हरियाणा 70 जागा काँग्रेसला येणार हे सगळेच सर्वे सांगत होते. जनतेचे मत ईव्हीएममध्ये बदलत असेल अशी चर्चा जनतेत सुरू आहे . EVM मशीनवर आमचा आरोप नाही. मात्र जनतेचेमध्ये सर्व्हेच्या माध्यमातून समोर आलं होतं, त्यावर देखील दुर्लक्ष करता येणार नाही. अजून मतमोजणी सुरू आहे आम्हाला आशा आहे की आम्ही हरियाणा सरकार स्थापन करू, असे नाना पटोले म्हणाले.

Assembly Election Results 2024 LIVE: जयराम रमेश यांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलाय. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच हरियाणामध्ये निवडणूक आयोगाचा डेटा स्लो अपडेट होत आहे.

Haryana Election Results 2024 Live: हरियाणात भाजपचे अर्धशतक, काँग्रेस ३४

Assembly Election Results 2024 LIVE: हरियाणामध्ये काँग्रेस पिछाडीवर पडले आहे. भाजपने ५० आकडा गाठला आहे. काँग्रेस ३४ जागांवर आघाडीवर आहे.

Assembly Election Results 2024 LIVE: हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपने आतापर्यंत ४९ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर आहे.

Haryana Election Results 2024 Live:  हरियाणात भाजपचे जोरदार कमबॅक, बहुमताचा आकडा पार

Assembly Election Results 2024 LIVE : हरियामध्ये भाजपने जोरदार कमबॅक केलेय. भाजप सध्या ४७ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ३६ जागांवर पुढे आहे. इतर सात जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत.

Haryana Election Results 2024 Live:  हरियाणामध्ये मतदारांची काँग्रेसला पंसती

Assembly Election Results 2024 LIVE : हरियाणा विधानसभासाठी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु झाली. सकाळी ११ वाजेपर्यंतच्या कलानुसार, काँग्रेसला ४०.५० टक्के मत पडली आहेत. तर भाजपला ३८.७० टक्के मते मिळाली आहेत.

Assembly Election Results 2024 LIVE : आम्ही दोन्ही राज्यात सरकार स्थापन करु - काँग्रेस नेता

Assembly Election Results 2024 LIVE : काँग्रेस नेता प्रमोद तिवारी यांनी हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्याचा विश्वास बालून दाखवलाय. एएनआयसोबत बोलताना त्यांनी हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये ६० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तवलाय.

Jammu-Kashmir Election Result Live Update

मतमोजणीचे आकडे आमच्या अंदाजानुसारच येत आहे. काँग्रेस-एनसी आघाडालीला यश मिळत आहे. पूर्ण बहुमतासह आम्ही सरकार स्थापन करु. हरियाणामध्येही काँग्रेसला आघाडी मिळेल. देशात बदलाचे वातावरण आहे. भाजपकडून एक एक करुन सर्व राज्य जात आहेत. जम्मू काश्मीरमध्ये भाजपला उमेदवार मिळत नव्हते. काश्मीर घाटीत ४७ जागांपैकी फक्त १९ जागांवर उभे आहेत. त्यांचा मित्रपक्ष कोण आहे, हेही सांगत नाहीत. लोकांना माहित आहे, सत्ता मिळवण्यासाठी भाजप कोणत्याही स्थराला जाऊ शकते. पण आता त्यांचं सर्व काही सत्य समोर आलेय. लोकांना भाजप नकोय.
रवींद्र शर्मा, काँग्रेस नेते

Haryana Election Results 2024 Live: विनेश फोगाट, दुष्यंत चोटाला पिछाडीवर

Assembly Election Results 2024 LIVE : हरियाणामध्ये काँग्रेस पिछाडीवर पडले आहे. काँग्रेसचे ३५ उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपने अर्धशतक पार केलेय. जुलाना मतदारसंघातून विनेश फोगाट पिछाडीवर पडल्या आहेत. उचाना कलां मतदारसंघात दुष्यंत चोटाला चौथ्या क्रमांकावर पोहचलाय. अंबाला कँटमधून अिल वीज पिछाडीवर आहेत.

Haryana Election Results 2024 Live Update 

पूर्ण निकाल शेवटचा राऊंडपर्यंत येऊ द्या, मला खात्री आहे हरियाणाची जनता स्वाभिमानी आहे. महाराष्ट्रातला मराठी माणूस लढवा, स्वाभिमानी आहे तसा हरियाणाचा देखील आहे. एखाद्या राज्यात राहुल गांधी, प्रियंका गांधी मुख्यमंत्री इकडे होणार नाही, ते राष्ट्रीय नेते आहेत.
संजय राऊत, शिवसेना(UBT)

Haryana Election Results 2024 Live: हरियाणामध्ये काँग्रेसला जोरदार धक्का

Assembly Election Results 2024 LIVE: सुरुवातीच्या कलामध्ये काँग्रेसला जोरदार आघाडी मिळाली आहे. काँग्रेसचे उमेदवार ६२ जागांवर आघाडीवर होते. पण मतमोजणी जस जशी पुढे गेली, तसं तसे भाजपच्या उमदेवारांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. हरियाणामध्ये भाजप सध्या ५२ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस फक्त ३३ जागांवरच पुढे आहे. हरियाणामध्ये वारे उलटे फिरल्याचे चित्र तयार झालेय.

Jammu-Kashmir Election Result Live : जम्मू काश्मीरमधील स्थिती काय?

Assembly Election Results 2024 LIVE: जम्मू कश्मीरमध्ये काँग्रेस आघाडीने सध्या ४९ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजप २३ जागांवर पुढे आहे. अन्य १८ जागांवर आघाडीवर आहेत.

Haryana Election Results 2024 Live:  हरियाणामध्ये चित्र बदलले, भाजपची जोरदार मुसंडी, काँग्रेस पिछाडीवर

Assembly Election Results 2024 LIVE: हरियाणामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपने ४२ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसची आघाडी कमी होऊन ४० जागांवर झाली आहे. सुरुवातीच्या कलामध्ये काँग्रेस ६२ जागांवर आघाडीवर होतं. पण दुसऱ्या टप्प्यात भाजपने मुसंडी मारली आहे.

Jammu-Kashmir Election Result: बिजबेहरामधून इल्तिजा मुफ्ती पिछाडीवर

Assembly Election Results 2024 LIVE : जम्मू काश्मीरच्या 90 विधानसभा मतदारसंघासाठी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु झाली. आतापर्यंत सर्व ९० जागांवरील सुरुवातीचे कल हातात आले आहेत. यामध्ये काँग्रेस आघाडीने मुसंडी मारली आहे. बिजबेहरा मतदारसंघातून पीडीपी प्रमुख आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती बिजबेहरामधून पिछाडीवर आहेत.

Haryana Election Results 2024 Live:  अंतिम निकालाची वाट पाहतोय, भाजपचं सरकार करणार : ओम प्रकाश धनखड

Haryana Election Results: हरियाणातील बदली येथेली भाजपचे उमेदवार ओम प्रकाश धनखड म्हणाले की, आम्ही अंतिम निकालाची वाट पाहत आहोत. दुपारपर्यंत आम्हीच सरकार स्थापन करत असल्याचे चित्र स्पष्ट होईल. सगळेच दावे करत आहेत पण कोणाचे दावे खरे आहेत हे निकालातून कळेल.

Assembly Election Results 2024 LIVE: हरियाणा आणि जम्मू कश्मीरमध्ये भाजपला जोरदार धक्का

हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीर या दोन्ही ठिकाणी सुरुवातीच्या कलांमधये भाजपला जोरदार धक्का बसला आहे. हरियाणात काँग्रेस 65 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 19 पर्यंत दिसत आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आघाडीने ५३ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप 22 जागांवर आघाडीवर आहे.

Jammu-Kashmir Election Result 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये त्रिशंकू विधानसभेचे संकेत

Assembly Election Results 2024 LIVE : जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांच्या मतमोजणीत आत्तापर्यंतच्या कलानुसार तेथे त्रिशंकू विधानसभा होण्याची चिन्हे आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-एनसी 43 जागांवर, भाजप 29 आणि इतर उमेदवार 17 जागांवर आघाडीवर आहेत.

Jammu-Kashmir Election Result : जम्मू काश्मीरमध्येही काँग्रेस आघाडी बहुमाताच्या जवळ

Assembly Election Results 2024 LIVE : जम्मू-काश्मीरमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस आघाडी बहुमताच्या जवळ आली आहे. काँग्रेस आघाडी सध्या 45 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 28 जागांवर पुढे आहे. पीडीपी 5 जागांवर तर इतर 12 जागांवर पुढे आहेत.

हरियाणामध्ये काँग्रेसने ६१ जागांवर आघाडी घेतली तर भाजप फक्त १९ जागांवर आघाडीवर आहे.

Haryana Election Results 2024 Live: हरियाणामधून कोण कोण आघाडीवर? 

मुख्यमंत्री नायब सिंह सैनी लाडवा मतदारसंघातून आघाडीवर आहेत.

जुलाना मतदारसंघातून विनेश फोगाट आघाडीवर आहे.

अंबाला कँटमधून अनिव विज आगाडीवर आहेत.

कॅथल मतदारसंघातून आदित्य सुरजेवाला आघाडीवर आहेत.

रानियामधून अर्जुन चौटाला आघाडीवर आहेत.

गढी सांपला-किलोई मतदारसंघातून भूपेंद्र सिंह हुड्डा आघाडीवर आहेत.

तोशाम मतदारसंघातून श्रुती चौधरी आघाडीवर

हरियाणाच्या इंदरवाल मतदारसंघातून अपक्ष जीएम सरूरी आघाडीवर आहेत.

Jammu-Kashmir Election Result : जम्मू कश्मीरमध्ये काँग्रेस आघाडीला मोठं यश, सुरुवातीच्या कलात ४७ जागांवर आघाडीवर

Assembly Election Results 2024 LIVE: जम्मू कश्मीरमध्ये काँग्रेस-एनसी आघाडी ४७ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपला २९ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर अन्य १७ जागांवर आघाडीवर आहेत.

Haryana Election Results 2024 Live:  हरियाणात भाजपला जोरदार धक्का, फक्त १७ जागांवर आघाडी, काँग्रेस ६० पार

Assembly Election Results 2024 LIVE : हरियाणामधील सुरुवातीच्या कलामध्ये काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आहे. भाजपला धक्का बसला आहे. हरियाणाध्ये काँग्रेस ६० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपला फक्त १७ जागांवर आघाडी मिळाली आहे. ७ जागांवर इतर आघाडीवर आहे. सुरुवातीच्या कलानुसार, हरियाणामध्ये काँग्रेस बहुमताने सत्तेत येण्याची शक्यता दिसत आहे. हरियाणातील सुरुवातीच्या ८६ जागांचे आकडे हातात आले आहेत. त्यामध्ये काँग्रेसला बहुमत दिसत आहे.

Assembly Election Results 2024 LIVE : विजयानंतर पंतप्रधान मोदींना जिलेबी पाठवणार, काँग्रेस नेत्याचं वक्तव्य

Assembly Election Results 2024 LIVE : आज दिवसभर आम्हाला लाडू आणि जिलेबी खायला मिळेल, असा विश्वास आहे. आम्ही पंतप्रधान मोदींनाही जिलेबी पाठवणार आहोत... हरियाणा, जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही बहुमताने सरकार स्थापन करणार आहोत, असा आम्हाला विश्वास आहे, असे पवन खेडा म्हणाले.

Haryana Election Results 2024 Live:  आम्हीच सरकार स्थापन करणार, भाजप नेत्याचा विश्वास

निकाल काहीही आले तरी हा ईव्हीएम, निवडणूक आयोग आणि भारताच्या लोकशाही परंपरांचा विजय असल्याचे स्पष्ट आहे. मला आशा आहे की जे एक्झिट पोल पाहून आनंदोत्सव साजरा करत होते, ते पाहिल्यानंतर ते ईव्हीएमला दोष देणार नाहीत. हरियाणात दोनदा आमचं सरकार बनलंय आणि तिसऱ्यांदा बनणार आहे... दोन्ही ठिकाणी भाजप स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन करणार आहे.
शेहजाद पूनावाला, भाजप नेते

Haryana Election Results 2024 Live:  रोहतकमध्ये भाजप आघाडीवर, काँग्रेसला फटका

Assembly Election Results 2024 LIVE : रोहतकमध्ये काँग्रेसला जोरदार धक्का बसलाय. रोहतक जागांवर भाजपचे मनीष ग्रोवर यांनी आघाडी घेतली आहे.

Jammu-Kashmir Election Result : जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसची मुसंडी

Assembly Election Results 2024 LIVE : जम्मू काश्मीरमध्ये काटें की टक्कर पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या कलामध्ये भाजप २१,काँग्रेस २८ आणि इतर १० जागांवर आघाडीवर आहेत.

Haryana Election Results 2024 Live: हरियाणामध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला

Assembly Election Results 2024 LIVE : हरियाणामध्ये सुरुवातीच्या कलामध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. काँग्रेस सध्या ४६ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप २० जागांवर आघाडीवर आहे.

Jammu-Kashmir Election Result : जम्मू काश्मीरमध्ये काटें की टक्कर

Assembly Election Results 2024 LIVE : जम्मू काश्मिरमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये काटें की टक्कर पाहायला मिळत आहे. भाजप २२ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसने २५ जागांवर आघाडी घेतली आहे.

Haryana Election Results 2024 Live: हरियाणामध्ये काँग्रेसची धोबीपछाड, ३८ जागांवर आघाडीवर

Assembly Election Results 2024 LIVE : सुरुवातीच्या कलामध्ये हरियाणामध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसचे ३८ उमेदवार आघाडीर आहेत. तर भाजपला २५ जागांवर आघाडी मिळाली आहे. इतर चार जागांवर आघाडीवर आहेत.

Haryana Election Results 2024 Live:  रोहतकमधून माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा आघाडीवर

सुरुवातीच्या कलामध्ये हरियाणातून माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा आघाडीवर आहेत.

Haryana Election Results 2024 Live:  हरियाणामध्ये काँग्रेस ३८ जागांवर आघाडीवर

Assembly Election Results 2024 LIVE : सुरुवातीच्या कलामध्ये हरियाणामध्ये काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे उमदेवार ३८ जागांवर आघाडीवर आहेत, तर २२ जागांवर भाजप आघाडीवर आहे.

Jammu-Kashmir Election Result : NC-BJP मध्ये काँटे की टक्कर १३-१३ जागांवर आघाडीवर

Assembly Election Results 2024 LIVE: जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणूक निकालात ३१ जागांवरील सुरुवातीचे कल हातात आले आहेत. यामध्ये नॅशनल कॉन्फ्रेंस 13, भाजप 13 आणि पाच जागांवर इथर उमेदवार आघाडीवर आहेत.

Jammu-Kashmir Election Result :  जम्मू काश्मीरमध्ये काटें की टक्कर

Assembly Election Results 2024 LIVE: जम्मू-काश्मीरमध्ये सुरुवातीच्या कलामध्ये काँग्रेस 10 जागांवर पुढे आहे. तर भाजप 8 जागांवर आघाडीवर आहे.

Haryana Election Results 2024 Live: हरियाणामध्ये सुरुवातीच्या कलात काँग्रेस ३२ जागांवर आघाडीवर

Assembly Election Results 2024 LIVE: हरियाणातील सुरुवातीच्या कलामध्ये काँग्रेस 32 जागांवर आघाडीवर आहे. भाजपने 14 जागांवर आघाडी घेतली आहे.

Haryana Election Results 2024 Live: हरियाणामध्ये काँग्रेसची मुसंडी, ३० जागांवर आघाडीवर

Assembly Election Results 2024 LIVE : हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलामध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. मतमोजणीला सुरुवात झाली, तेव्हा भाजपने आघाडी घेतली होती. पण काँग्रेसने मुसंडी मारली. हरियाणात काँग्रेस 30 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 10 जागांवर पुढे आहे. 2 जागांवर इतर आघाडीवर आहेत.

त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस 6 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 2 जागांवर आघाडीवर आहे.

Haryana Election Results 2024 Live:  हरियाणामध्ये भाजपला आघाडी

Assembly Election Results 2024 LIVE: हरियाणामध्ये सुरुवातीच्या कलामध्ये भाजपला मोठी आघाडी मिळाली आहे. भाजप ५ जागांवर आघाडीवर आहे, तर कांग्रेस चार जागांवर आघाडीवर आहे.

Haryana Election Results 2024 Live:  हरियाणामध्ये मतमोजणीला सुरुवात, भाजपला मोठी आघाडी

Jammu-Kashmir Election Result 2024: उमर अब्दुल्ला यांनी केला विजयाचा दावा

Assembly Election Result 2024 LIVE :  जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विजयाचा दावा केला आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

Assembly Election Result 2024 LIVE : जम्मू काश्मीर आणि हरियाणात थोड्याच वेळात मतमोजणी होणार

जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कुठलाही अनूचित प्रकार घडू नये म्हणून मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही राज्यांच्या विधानसभेचं चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Jammu Kashmir Assembly Election Result 2024 LIVE : जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा ३५ जागा जिंकणार, रविंद्र रैना यांना विश्वास

जम्मू-काश्मीरमधील ९० जागांपैकी भाजप ३५ जागांवर विजय मिळवणार, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांनी व्यक्त केला आहे. राज्यात थोड्यात वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. याआधी रैना यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे.

Jammu Kashmir Assembly Election Result 2024 LIVE : विधानसभेच्या निकालाआधीच जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या घडामोडी

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचा आज जाहीर होणार आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये नेमकी कोणाची सत्ता येणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक अतिशय चुरशीची झाली. एक्झिट पोलमध्ये त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवला आला.

दरम्यान, या निकालाआधीच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी एक मोठं विधान केलं. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मेहबूबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीशी गठबंधन करण्यास आम्ही तयार आहोत, असं विधानस फारुख अब्दुल्ला यांनी केलं. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाआधीच जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Assembly Election Result 2024 LIVE : जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभेचा आज निकाल, कुणाची येणार सत्ता?

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आज ९ ऑक्टोबर रोजी लागणार आहे. दोन्ही राज्यात विधानसभेच्या प्रत्येकी ९०-९० जागा आहेत. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणूक झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. दुसरीकडे हरियाणात सलग १० वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. यंदा मात्र, काँग्रेसने ही सत्ता आपल्याकडे खेचून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहे. दोन्ही राज्यातील निकालामुळे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बदलू शकते. कारण, यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहे. असं राजकीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीत हे लहान पक्ष सुद्धा ठरू शकतात 'गेम चेंजर'; कसे ते जाणून घ्या!

Bhagya Nair: रोहित शेट्टीच्या सिंघम अगेनमध्ये झळकलेली मराठमोळी अभिनेत्री भाग्या नायर कोण?

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Swiggy CEO networth : स्विगीचे सीईओंचं शिक्षण आणि नेटवर्थ किती?

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

SCROLL FOR NEXT