Crime News Saam TV
देश विदेश

Viral News : मुलीचं लग्न अवघ्या १० दिवसांवर अन् आईने ठोकली प्रियकरासोबत धूम, दागिनेही केले लंपास

मुलीचे लग्न अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपलं असताना, आईच आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Satish Daud

हरिद्वार : मुलीचं लग्न अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपलं. संपूर्ण घरात लगीनघाई सुरू होती. वधू आणि वर पक्षाकडून दाग-दागिन्यांची खरेदी सुद्धा झाली. अशातच आपल्याकडे कुणाचं लक्ष नाही, याचा फायदा घेत मुलीच्या आईने आपल्या प्रियकरासोबत धूम ठोकली. एवढंच नाही तर जाताना तिने सोन्या-चांदीचे दागिनेही लंपास केले आहेत. उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यातून ही अजब घटना समोर आली आहे. (Latest Marathi News)

याप्रकरणी कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी महिलेसह तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून दोघांचाही शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरिद्वारमधील मंगलौर परिरसरात राहणाऱ्या एका 38 वर्षीय महिलेच्या मुलीचे लग्न ठरले होते. या महिलेला 3 मुली आणि एक मुलगा असून वर्षभरापूर्वी तिच्या पतीचं निधन झालेलं होतं.

लग्नाची तारीख 14 डिसेंबर ठरली होती. घरात अगदी आनंदाचं वातावरण होतं. पाहुण्यांची वर्दळही वाढली होती. अशातच घरात लग्नसराईचे वातावरण असतानाच, मुलीची आई मात्र तिच्या कुटुंबियांना सोडून अचानक घर सोडून तिचा प्रियकर राहुल याच्यासोबत पळून गेली. एवढंच नाही तर जाताना तिने मुलीच्या लग्नात देण्यासाठी आणलेले सोन्या-चांदीचे दागिनेही लंपास केले.

अचानक रात्री महिला घरातून फरार झाल्याने कुटुंबीयांना शंका आली, त्यांनी याबाबत तपास केला असता, ती आपल्या प्रियकरासोबत फरार झाली असल्याचं नातेवाईकांना समजलं. त्यानंतर नातेवाईकांनी घराची झडती घेतली असता लाखो रुपयांचे दागिनेही गायब झाल्याचे आढळून आले. या संपूर्ण प्रकारानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला आणि तिचा प्रियकर एकाच कंपनीत काम करत होते. त्यामुळे दोघांचेही एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. या काळात त्यांचे सूत जुळले आणि त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. सध्या पोलिसांकडून दोघांचाही शोध सुरू आहे. मुलीचे लग्न 10 दिवसांवर असताना आईच प्रियकरासोबत पळून गेल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

SCROLL FOR NEXT