Haridwar Accident News : हरिवद्वारमधून अपघाताची मोठी बातमी हाती आली आहे. हरिद्वारच्या बहादराबादमध्ये एका भरधाव वाहनाने वरातीत नाचणाऱ्या लोकांना उडवले. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. या भीषण अपघात एकाचा मृत्यू झाला असून ३१ जण जखमी झाले आहेत.
हरिद्वारच्या बहादराबादमध्ये चारचाकीच्या चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच मृत्यू झाला आहे. तर दोन जणांची प्रकृती नाजूक आहे. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी चालकाला बेदम चोप दिला आहे. पोलीस अपघातस्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.
कसा झाला अपघात?
शुक्रवारी रात्री बहादरबादच्या धनौरी रोडजवळील सरदार फार्म हाऊसमध्ये ग्राम बेलडा जवळ वरातील काही लोक नाचत होती. त्यावेळी एक भरधाव कार वरातीत शिरली. ही भरधाव वरातीत शिरल्याने मोठा अपघात झाला.
या अपघातात सागर नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर अपघातात (Accident) एकूण ३१ जण जखमी झाले. अपघातानंतर वरातीतील लोकांना कार चालकाला बेदम मारहाण करत जखमी केले.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस (Police) अधिकारी नितेश शर्मा आणि इतर पोलीस कर्मचारी अपघातस्थळी हजर झाले. त्यानंतर पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. तसेच पोलिसांनी अपघातस्थळी नियंत्रण मिळवलं. या अपघाताच व्हिडि सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अपघाताचा व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी हळहळ व्यक्त करत आहेत.
छत्तीसगड राज्यात कांकेर जिल्ह्यातील कोरार गावाजवळ शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ऑटोला ट्रकने धडक दिल्याने सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर एक विद्यार्थी आणि ऑटोचालक जखमी आहेत. जखमी विद्यार्थ्यांना कोरार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, महानिरीक्षक बस्तर पी सुंदरराज यांनी या अपघाताची माहिती दिली आहे. ही घटना बुधवारी घडली.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील कांकेर येथील कोरेरजवळची ही घटना आहे. शाळा संपल्यानंतर बारा मुले ऑटोने आपल्या घरी जात होती. यादरम्यान कोरेरजवळ भरधाव ट्रकने ऑटोला धडक दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.