Hamas Terrorist Call Saam Tv
देश विदेश

Hamas-Israel War: Audio Viral; 'डॅड! मी १० ज्यूंना मारलं', ज्यू कुटुंबियांची हत्या केल्यानंतर हमास दहशतवाद्याचा वडिलांना फोन

Hamas-Israel War: ही ऑडिओ क्लिप इस्राइलच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलीय.

Bharat Jadhav

Hamas Terrorist Call Audio Goes Viral :

गेल्या काही दिवसांपासून हमास आणि इस्राइलमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात हजारो लोकांचा मृत्यू झालाय. हमास दहशतवादी संघटना किती क्रूर आहे हे दाखवणारे व्हिडिओ आणि फोटो इस्राइलकडून प्रसिद्ध करण्यात येत आहेत. याच दरम्यान इस्राइलने एक ऑडिओ क्लीप व्हायरल केलीय. यात एक हमास दहशतवादी आपल्या कुकर्माचं कौतुक आपल्या बापाला सांगत आहे. त्याच्या कामाला त्याचे वडील देखील कौतुक करत आहेत. (Latest News)

दहशतवाद्याने ज्या ज्यू महिलेचा खून केलाय त्याच महिलेचा मोबाईल फोन घेऊन तो त्याची माहिती आपल्या कुटुंबियांना देतोय. आपण महिला आणि तिचा पती, त्यांच्या मुलांना ठार मारल्याची माहिती तो आपल्या कुटुंबियांना देतो. वडिलांशी सांगतोय की १० ज्यू लोकांच्या रक्ताने त्याचे हात माखले आहेत.

(सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा)

ही ऑडिओ क्लिप इस्राइलच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलीय. सोशल मीडियाच्या एक्स (पहले ट्वीट) या प्लॅटफॉर्मवर हा ऑडिओ शेअर करण्यात आलाय. यात तुम्ही स्पष्टपणे ऐकू शकता की कसे हमासचा एक महमूद नावाचा दहशतवादी १० ज्यू लोकांना मारून खूश होत आहे. त्याने केलेल्या हत्यांची माहिती तो आपल्या कुटुंबियांना देतोय. त्याच्या का कृत्यावर त्याचे कुटुंबीय खूश होत आहेत.

याच दरम्यान दहशतवादी महमूद आपल्या वडिलांना व्हॉट्स अॅपवर येण्यासाठी सांगतो. त्याचवेळी तो आपल्या आई आणि भावाशी बोलतो. दहशतवादी त्याच्या आईला म्हणतो की, त्यांचा मुलगा हा हिरो आहे. दहशतवाद्याचा भाऊ त्याला परत येण्यास सांगतो. परंतु तो परत येणार नसल्याचं म्हणतो. आपल्या मुलाचे कारनामा ऐकून त्याचे वडील खूश होतात आणि अल्लाह- हू- अकबर म्हणतात.

व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये हमास दहशतवादी आपल्या वडिलांसाठी सांगतोय की, 'डॅडी मी १० ज्यू लोकांना ठार मारलं. आत्ताच एक ज्यू महिला आणि तिच्या पतीला ठार मारलं असं म्हणताना दिसतोय. अल्लाह हू अकबर असं म्हणत त्याच्या कृत्यावर त्याचे वडील खूश होतात. मुलाच्या कृत्याचं कौतुक करतात. आणि त्याच्या सुरक्षेसाठी देवाकडे प्रार्थना करत असल्याचं ऑडिओ मध्ये ऐकू येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : कोंढवा तरुणी अत्याचार प्रकरणात पुन्हा ३६० डिग्री टर्न, आरोप असलेल्या तरुणाला अटकच नाही

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन हेकडी काढेन'; 'या' खासदाराचं राज ठाकरेंना आव्हान | VIDEO

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Moong Dal Paratha Recipe : पावसाळ्यात खा गरमा गरम अन् मऊ लुसलुशीत मूग डाळ पराठा

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

SCROLL FOR NEXT