Hamas-Israel War Saam Digital
देश विदेश

Hamas-Israel War: जगभरातील हमासच्या नेत्यांना शोधा अन् गोळ्या घाला....इस्राइलचा काय आहे पुढचा प्लान? जाणून घ्या

Hamas-Israel War: इस्राइल आणि हमासमध्ये दोन महिन्यांपासून भयंकर युद्ध सुरू आहे. यात हजारो लोक मारले गेले आहेत तर हजोरो जखमी झाले आहेत. यादरम्यान जगभरातील हमासच्या नेत्यांना शोधून गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.

Sandeep Gawade

Hamas-Israel War

इस्राइल आणि हमासमध्ये दोन महिन्यांपासून भयंकर युद्ध सुरू आहे. यात हजारो लोक मारले गेले आहेत तर हजोरो जखमी झाले आहेत. यादरम्यान इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी, केवळ गाझापट्टीतच नाही तर जगभरातील हमासच्या नेत्यांना शोधून गोळ्या घालण्याचे आदेश, देशाच्या प्रमुख गुप्तचर संस्थांना दिले आहेत. ७ ऑक्टोबरला इस्राइलवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इस्राइलच्या गुप्तचर संस्था योजना आखत असल्याचं वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने दिले आहे.

इस्रायलच्या गुप्तचर संस्था तुर्की, लेबनॉन आणि कतारमधील हमास नेत्यांचा शोध घेण्याचे काम करत आहे. कतारने हमासला राजधानी दोहामध्ये दशकभर कार्यालय चालवण्याची परवानगी दिली आहे. तर गाझात सात दिवस युद्धबंदी करण्यात कतारनेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या युद्धबंदी दरम्यान हमासने गाझापट्टीत ओलीस ठेवलेल्या १०० हून अधिक नागरिकांची सुटका करण्यात आली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हमासला अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले असतानाही कतार, इराण, रशिया, तुर्की आणि लेबनॉन या देशांनी हमासला अनेक वर्षांपासून सुरक्षा पुरवली आहे. राजकीय संकट टाळण्यासाठी इस्राइलने पॅलेस्टाईनला लक्ष्य करणे टाळले आहे. नेत्यानाहू यांनी २२ नोव्हेबरच्या आपल्या भाषणात यासंदर्भात माहिती दिली होती. मोसादला हमासचे प्रमुख जगभरात जिथे असतील तिथे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान मोसादचे माजी संचालक इफ्रेम हॅलेव्ही यांनी या योजेनेबाबत शंका व्यक्त केली आहे. या मोहिमेचे अनपेक्षित परिणाम परिणाम होऊ शकतात अशा इशाराही त्यांनी दिला आहे. यामुळे या भागात दीर्घ काळासाठी अस्थिरता निर्माण होऊ शकते. हमासचे तळ नष्ट केल्यामुळे इस्राइलचा धोका संपणार नाही, असे हॅलेव्ही यांनी म्हटल्याचा दावा डब्ल्यूएसजेने यासंदर्भात दावा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT