Pahalgam Attack 
देश विदेश

Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यामागे 'हमास'चा हात; हमास, हाफिज आणि मसूदनेच रचला कट

Pahalgam Attack: पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमास, हाफीस सईद, मसूद अजहरनेच चिथावणीखोर भाषणातून पहेलगाम हल्ल्याची स्क्रिप्ट लिहिली असल्याचं म्हटलं जात आहे.

Bharat Mohalkar

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात एका स्थानिक काश्मिरी मुलाने धाडस दाखवत एका पर्यटकाच्या लहान मुलाला वाचवलं. याचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला असून स्थानिक तरुणाने दाखवलेल्या धैर्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. दहशतवादी गोळीबार करत असताना या काश्मिरी मुलाने एका पर्यटकाच्या हातातलं लहान बाळ आपल्या हातात घेऊन सुरक्षित ठिकाणी नेलं.

दहशतवाद्यांनी पहेलगाममध्ये भारताच्या आत्म्यावरच हल्ला केला आणि देशात संतापाची लाट उसळली. मात्र या हल्ल्याची पाळंमुळं थेट हमासपर्यंत पोचलीयत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमास, हाफीस सईद, मसूद अजहरनेच चिथावणीखोर भाषणातून पहेलगाम हल्ल्याची स्क्रिप्ट लिहिली

आतापर्यंत पाकड्यांनी पाळलेल्या दहशतवाद्याकडून भारतावर हल्ले केले जात होते. मात्र आता यात थेट हमासने एण्ट्री केलीय. काश्मीरला जिहादचं मैदान बनवण्यासाठी हमासचा प्रतिनिधी डॉ. खालिद कद्दुमी, मसूद अझहरचा भाऊ तल्हा सैफ, जैशचा लॉन्चिंग कमांडर मसूद इलयासी, हाफिज सईदचा मुलगा स्टेजवर उपस्थित होता. याच मेळाव्यातून काश्मीरमध्ये नंगानाच करण्याची स्क्रिप्ट रचली गेली.

कशी रचली पाकड्यांनी स्क्रिप्ट?

5 फेब्रुवारी 2025

पीओकेतील रावलकोटच्या शहीद साबिर स्टेडियमवर काश्मीर एकता दिनाचा मेळावा

मेळाव्यात लिहीली पहेलगाम हल्ल्याची स्क्रिप्ट

स्टेजवर लष्कर ए तैयब्बा, जैश ए मोहम्मदचे कमांडरही उपस्थित

हमासचा प्रतिनिधी डॉ. खालिद कद्दूमी मेळाव्यात उपस्थित

हमासच्या अल अक्सा फ्लड ऑपरेशन भारतविरोधी जिहादच्या रुपात सादर

काश्मीरला जिहादचे पुढील मैदान बनवण्याबाबत ओकलं विष

याच मेळाव्यातून जिहादच्या नावाखाली भारतात हैदोस घालण्याची चिथावणी भारताचा दुश्मन सैफुल्ला कसुरीने दिली. भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या आणि आतंकिस्तानमध्ये लपलेल्या हाफिज सईद, मसूद आणि हमासच्या दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करायला हवेत..एवढंच नाही तर या नापाक इराद्यांसह भारतावर हल्ला करण्यासाठी चिथावणी देणाऱ्या दहशतवाद्यांना वेचून वेचून ठेचायला हवं आणि पाकड्यांना धडा शिकवायला हवा..हीच 28 मृत देशवासियांसाठी खरी श्रद्धांजली असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT