Gold Rate : लग्न सराई सुरू होताच सर्वत्र दागिने खरेदी करण्याची घाई होते. अशात खरेदी केलेले दागिने हे संपूर्ण सोन्याचे असावे असंच प्रत्येकाला वाटतं. तसेच फसवणूक होऊनये यासाठी अनेक व्यक्ती आता हॉलमार्किंग असलेलेच दागिने खरेदी करतात. सोने आणि दागिन्यांची खरेदी करण्यासाठीचे नियम आता बदलण्यात आले आहेत.हे नियम १ एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहेत. (Latest hallmark gold rate News)
आजवर हॉलमार्किंगचे सोने खरेदी करताना त्यातही दोन प्रकारचे हॉलमार्किंग असते. त्यामुळे चार अंकी हॉलमार्किंग योग्य की आठ अंकी हॉलमार्किंग योग्य यातही अनेक नागरिकांच्या मनात संभ्रम आहे. तसेच अनेक व्यक्ती हॉलमार्किंग नसलेल्या सोन्याचे दागिने खरेदी करतात. यात फसवणूक होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यामुळेत ग्राहक व्यवहार मंत्रालयाने ३१ मार्च २०२३ नंतर HUID म्हणजेच हॉलमार्किंगचे सोने तसेच दागिने खरेदी आणि विक्रीसाठ अनिवार्य केले आहे.
अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग शिवाय खरेदी विक्री करता येणार नाही.
लागू करण्यात आलेल्या नविन नियमात असं म्हटलं आहे की, प्रत्येक ग्राहकाला आणि विक्रेत्याला अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग म्हणजे ६ अंकी हॉलमार्किंग असलेले सोन्याचे दागिने विकता येणार आहेत. तसे नसल्यास इतर दागिने वैध मानले जाणार नाहीत.ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीनेच हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
देशात हॉलमार्किंगची किती केंद्र आहेत?
गेल्या दीड वर्षांपासून यावर चर्चा सुरू होती. त्यामुळे सरकारने यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. देशात ३३९ केंद्रांवर सोन्याचं उत्पदन होतं. या ठिकाणी Bis केंद्र देखील उभारण्यात आलेत. हॉलमार्किंचे सध्या देशात १,३३८ केंद्र आहेत. लवकरच आणखी केंद्र वाढवण्यासाठी सकारकडून काम सुरू आहे.
HUID म्हणजे नेमक काय?
HUID (हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन)यात एक ६ अंकी क्रमांक असतो. प्रत्येक व्यक्तीला जसा आधार क्रमांक असतो त्या प्रमाणे हा दागिन्यांसाठी क्रमांक असतो. याला अल्फान्यूमेरिक कोड देखील म्हणू शकता. कारण हा कोड अक्षर आणि अंक यांपासून बनवण्यात येतो. प्रत्येक दागिन्यासाठी स्वतंत्र युनिक हॉलमार्क नंबर तयार केला जातो.
यामध्ये हा दागिना कोणी खरेदी केला आहे. त्याचं वजन किती आहे. सोन्याचा किती वापर करण्यात आला आहे. या सर्वच गोष्टी त्या एका नंबरवर असतात. हा नंबर ज्वेलर्सला बनवण्याची अनुमती आहे. हॉलमार्क नंबर तयार झाल्यानंतर ज्वेलर्सनी तो BIS या पोर्टल साईटवर अपलोड करणे गरजेचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.