Gurugram Tragedy Engineer Couple Found Dead Saam Tv
देश विदेश

आधी बायकोला संपवलं, नंतर नवऱ्यानं आयुष्याचा दोर कापला; मित्राला VIDEO पाठवत म्हणाला.. इंजिनिअर कपलचा दुर्देवी अंत

Husband Strangles Wife, Ends Life With Hanging: गुरुग्राममध्ये इंजिनिअर तरूणानं पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. परिसरात खळबळ.

Bhagyashree Kamble

  • इंजिनिअर कपलमध्ये वाद.

  • पतीनं पत्नीला संपवलं.

  • नंतर स्वत: ही आयुष्य संपवलं.

गुरूग्राममधील सेक्टर १० ए हद्दीतील सेक्टर ३७ मधील सिटी सोसायटीत रविवारी संध्याकाळी धक्कादायक घटना घडली. इंजिनिअर तरूणानं भांडणानंतर पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. तीन महिन्यापूर्वी दोघांचं अरेंज मॅरेज झालं होतं. मात्र, काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. भांडणामुळे ही घटना घडली असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची ओळख अजय कुमार (वय वर्ष ३०) आणि त्याची पत्नी स्वीटी शर्मा (वय वर्ष २८) अशी झाली आहे. अजय हा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी होता. तर, स्वीची पश्चिम बंगालची रहिवासी होती. त्यांचं तीन वर्षांपूर्वी अरेंज मॅरेज झालं होतं. दोघेही इंजिनिअर असून, गुरूग्राममधील एका आयटी कंपनीत कार्यरत होते.

गेल्या दोन वर्षांपासून हे जोडपं मिलेनियम सिटी सोसायटीत वास्तव्यास होते. १३ व्या मजल्यावर भाड्याने राहत होते. घटनेपूर्वी अजयने आपल्या मित्राला व्हिडिओ पाठवला होता. ज्यामध्ये त्यानं आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. संबंधित मित्राने लगेच पोलिसांना माहिती दिली.

पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत दोघांचा जीव गेला होता. पत्नी जमिनीवर मृत अवस्थेत पडली होती. तर, अजय गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. पोलीस आणि इतर पथकाने घटनास्थळाची तपासणी केली. स्वीटीची हत्या स्कार्फने गळा दाबून करण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर अजयनं आयुष्याचा दोर कापला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT