Gujrat Rajkot News Saam
देश विदेश

वंशाच्या दिव्यासाठी आईनं पोटच्या २ महिन्यांच्या चिमुकलीला संपवलं; पाण्याच्या टाकीत बुडवलं

Gujrat Rajkot News: राजकोटमधून धक्कादायक बातमी समोर. पोटच्या २ महिन्यांच्या लेकीला संपवलं. मुलाच्या हव्यासापोटी चिमुकलीचा घेतला जीव.

Bhagyashree Kamble

  • गुजरातच्या राजकोटमध्ये आईनं २ महिन्यांच्या मुलीची हत्या केली.

  • स्वयंपाकघरातील पाण्याच्या टाकीत बुडवून चिमुकलीचा जीव घेतला.

  • आरोपी आई मुस्कानला मुलगा हवा होता म्हणून तिनं हा गुन्हा केला.

  • पती साजिदच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.

आई मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना गुजरातमधील राजकोटमधून समोर येत आहे. वंशाच्या दिव्यासाठी आईनं पोटच्या लेकीला संपवलं. स्वयंपाकघरातील पाण्याच्या टाकीत बुडवून आईनं २ महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला. आधी चिमुकली बेपत्ता झाली असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, पोलीस तपासानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली. या प्रकरणी महिलेच्या पतीनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

मुस्कान कयानी असे आरोपी महिलेचे नाव आहे. तर, साजिद कयानी, असं तक्रारदार पतीचे नाव आहे. हे संपूर्ण प्रकरण कोटडा सांगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. व्यवसायाने कामगार असलेल्या साजिदनं पोलिसांना सांगितले की, मुस्कानचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना सहा वर्षांची नूरेना नावाची मोठी मुलगी आहे.

कौटुंबिक कलहामुळे साजिद आणि मुस्कान त्यांच्या पालकांपासून वेगळे राहत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांची दुसरी मुलगी आयेशा जन्माला आली. घटनेच्या दिवशी साजिद सकाळी ८ वाजेच्या कामाला गेला होता. सायंकाळी मुस्कानने साजिदला फोन केला होता.

२ वर्षांची चिमुकली आयेशा पाळण्यावरून बेपत्ता झाली असल्याची माहिती दिली. हे ऐकताच साजिदला धक्का बसला. त्यानं ताबडतोब पालकांना याची माहिती दिली. त्यांनी घराकडे धाव घेतली. तसेच बाळाचा शोध घेऊ लागले. शोध सुरू असताना स्वयंपाकघरातील पाण्याच्या टाकीत आयेशाचा मृतदेह आढळला.

कुटुंबियांनी तिला तातडीने रूग्णालयात नेले. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. काही दिवसांनंतर साजिदला मुस्कानवर संशय येऊ लागला. त्यानं मुस्कानला माहेरी धाडलं. काही दिवसानंतर मुस्कानच्या भावाने साजिदला आयेशाविषयी हकीकत सांगितली. मुस्कानने माहेरी कबुली दिली. मुलगा हवा होता, यामुळे आयेशाची हत्या केली, असं तिनं सांगितलं.

सुरूवातीला साजिदनं पोलिसांकडे जाण्याऐवजी मुस्कानकडे घटस्फोटाची मागणी केली. यानंतर मु्स्काननं थेट पोलिसांकडे धाव घेतली. तसेच साजिदविरोधात तक्रार दाखल केली. खोट्या आरोपांमुळे त्रस्त झालेल्या साजिदनं अखेर पोलिसांना सगळं खरं सांगितलं. साजिदच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुस्कानविरोधात तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चेसाठी CJP रवाना

Kitchen Hacks : फ्रिजमधून घाण वास येतोय ? तर चहापत्तीचा 'हा' भन्नाट उपाय करून पाहा

मोठी बातमी: NEET पेपरफुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आक्रमक! केंद्र अन् NTA वर ताशेरे; कोर्टात नेमकं काय घडलं?

Crime: मित्रासमोरच तरुणीवर सामूहिक बलात्कार, जंगलात फिरण्यासाठी गेले असता भयंकर घडलं

Mumbai Police : दादरमध्ये संतापजनक घटना! आंदोलक विद्यार्थिनीला पोलिसाकडून चुकीचा स्पर्श? व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ

SCROLL FOR NEXT