Gujrat: 9 हजार कोटींची हेरोईन जप्त; जगातली आतापर्यंतची सर्वात मोठी तस्करी Saam Tv
देश विदेश

Gujrat: 9 हजार कोटींची हेरोईन जप्त; जगातली आतापर्यंतची सर्वात मोठी तस्करी

गुजरातमध्ये तब्बल 9 हजार कोटी रुपयांची हेरोईन जप्त करण्यात आली आहे. कच्छच्या मुंद्रा बंदरावर DRI ने झडती घेतली अन् त्यांच्या छाप्यात ही हेरोईन सापडली आहे.

वृत्तसंस्था

गुजरात : गुजरातमध्ये तब्बल 9 हजार कोटी रुपयांची हेरोईन जप्त करण्यात आली आहे. कच्छच्या मुंद्रा बंदरावर DRI ने झडती घेतली अन् त्यांच्या छाप्यात ही हेरोईन सापडली आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तर या तस्करीत अफगाण चा संबंध असल्याचं म्हणलं जात आहे त्यामुळे काही अफगाण नागरीकांचाही शोध घेतला जात आहे.

हे देखील पहा-

हेरोईनची टीप कशी लागली?

आंध्र प्रदेश Andhra Pradesh मधील विजयवाडा आशी ट्रेडींग नावाची एक कंपनी आहे. या कंपनीने अफगाणिस्तानमधून Afghanistan काही वस्तू इम्पोर्ट केल्याची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली होती. या वस्तूंमध्ये ड्रग्ज असल्याचं टीप मिळाली. त्याच माहितीच्या आधारे मुंद्रा बंदरात आलेल्या दोन कंटेनरची झडती घेतली. कंटेनरमध्ये ड्रग्जसारखी पावडर आढळून आली. त्यांनी अधिक चौकशी दरम्यान, ती पावडर टॅलकम पावडर असल्याची सफाई दिली गेली. त्यांनी ती पावडर तपासली आणि त्यात हेरोईन असल्याचा प्रकार आढळून आला. माहितीनुसार पहिल्या कंटेनरमध्ये १९९९.५८ किलो ग्राम हेरोईन होती. तर दुसऱ्या कंटेनरमध्ये ९८८.६४ किलो ग्राम म्हणजेच जवळपास ३ हजार किलो ग्राम एवढी हेरोईन जप्त करण्यात आली आहे.

हेरोईन सापडली त्याची पुढे चौकशी ?

गुजरातमध्ये डीआरआयला जी हेरोईन सापडली. ती जवळपास ९ हजार कोटी रुपये किंमतीची असल्याची माहिती मिळाली आहे. ह्या छाप्यानंतर दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, गांधीधाम, मांडवी या ठिकाणी छापे टाकून चौकशी केली जात आहे. यासंबंधी आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. काही अफगाण नागरीकांचा शोध सुरु असल्याचे सांगितले जात आहे. अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार- ही जगातली आतापर्यंतची जप्त केलेली सर्वात मोठी हेरोईनची तस्करी आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Tumor: अचानक ताप येण्यासोबत ही ४ लक्षणं दिसली तर असू शकतो ब्रेन ट्यूमरचा धोका; कसे ओळखाल संकेत?

Crime News : घराच्या छपरावर चढला, आईवर बंदुकीने निशाणा धरला; पोटच्या मुलाने केली जन्मदात्रीची गोळी झाडून हत्या

Municipal Elections Voting Live updates : मराठमोळ्या कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार

Bank Jobs: खुशखबर! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी; ६०० पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Eggless Banana Cake : लहान मुलांनसाठी एग्लेस बनाना केक करायचा आहे? लगेच नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT