BJP leader Vijay Modi  
देश विदेश

BJP Leader Arrested : घरात आढळल्या ६४५ दारूच्या बाटल्या, भाजप नेत्याला अटक, राजकारणात खळबळ

BJP leader Vijay Modi arrested in Surat liquor case : सुरतमध्ये भाजप नेते विजय मोदी यांच्या घरातून २.६५ लाख रुपये किमतीच्या ६४५ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी विजय मोदी आणि त्यांच्या साथीदाराला अटक केली.

Namdeo Kumbhar

BJP leader Vijay Modi : सुरतच्या खांड बाजार येथील लक्ष्मी भवनमधील एका घरात तब्बल २.६५ लाख रुपयांचा दारूसाठा सापडला. पोलिसांनी य प्रकरणी भाजपचे वॉर्ड सरचिटणीस विजय मोदी यांना अटक केली आहे. या प्रकरणात त्यांचा मुलगा राज मोदी यांचाही सहभाग असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. भाजपच्या शहर अध्यक्षांनी मोदी यांना सात दिवसांत खुलासा द्या, अशी नोटीस पाठवली आहे.

मंगळवारी सुरत पोलिसांनी भाजप नेते विजय मोदी आणि त्यांच्या साथीदाराला अटक केली. त्यांच्या घरातून २.६५ लाख रुपये किमतीच्या इंडियन मेड फॉरेन लिकरच्या (IMFL) बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. मोदी हे सुरत शहरातील वॉर्ड क्रमांक २१ चे भाजपचे महासचिव आहेत. त्यांच्या अटकेची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सुरत शहर भाजप अध्यक्ष परेश पटेल यांनी ७ दिवसांच्या आत स्पष्टीकरण मागण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

गुजरात राज्यात दारूबंदी आहे. राज्यात परवान्याशिवाय दारूची विक्री आणि सेवन करण्यास बंदी आहे. लालगेट पोलिसांनी सुरतच्या खंड बाजार येथील लक्ष्मी भवन इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीवर छापा टाकला. त्या छाप्यात विविध ब्रँडच्या आयएमएफएल (IMFL) दारूच्या ६४५ बाटल्या जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी घरमालक विजय मोदी आणि त्याचा साथीदार करण पानवाला यांना अटक केली. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी सांगितले की, विजय आणि त्याचा मुलगा राज मोदी हे दारूच्या अवैध व्यापारात सहभागी होते. राज मोदीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

दारूच्या व्यापारात कथित सहभागाबद्दल विजय मोदी यांना सुरत शहर भाजप अध्यक्ष परेश पटेल यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही कारणे दाखवा नोटीस सोशल मीडियावरही व्हायरल झाली आहे. 'दारूबंदीच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर आम्ही विजय मोदी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पोलिसांनी प्रथम तपास करावा अशी आमची इच्छा आहे. मोदींच्या उत्तराच्या आधारे आम्ही पुढील कारवाई करू,' असे पटेल म्हणाले. दरम्यान, राज मोदी यांच्यावर दारूबंदीचे १३ खटले प्रलंबित आहेत. मात्र, त्यांचे वडील विजय मोदी यांच्यावर दाखल झालेला हा अशा प्रकारचा पहिलाच गुन्हा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील रांझणी फाट्याजवळ प्रवासी रिक्षा आणि मोटारसायकलची धडक

Union Cabinet: बंदरे ते एअरपोर्ट, 19,934 कोटींचा खर्च; केंद्राकडून ५ योजनांना मंजुरी, वाचा मोदी सरकारनं घेतलेले ५ मोठे निर्णय

शिंदे आणि फडणवीस यांना कोंडीत पकडणारा सवाल! पहाटेचा शपथविधी आणि मविआ काळाचा दाखला, कोर्टात नेमकं काय झालं?

Weight Loss Exercise: नवीन वर्ष सुरू होण्याआधी करायचंय वजन कमी? रोज करा हा एक व्यायाम, झटपट दिसेल फरक!

Maharashtra News : ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय आणि डिजिटल सेवा गावातच उपलब्ध होणार

SCROLL FOR NEXT