Gujrat Breaking: भुपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री 
देश विदेश

Gujarat Breaking: भुपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भाजपा नेते विजय रुपाणी यांनी काल (11 सप्टेंबर) गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर गुजरातचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याबाबत मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. त्यानंतर आता घाटलोदिया मतदारसंघाचे आमदार भुपेंद्र पटेल यांची गुजरातचे नवे मुख्यमंत्री पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भूपेंद्र पटेल गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री असतील. गांधीनगर मधील भाजप कार्यालायात भाजपच्या विधिमंडळ सदस्यांची बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत भूपेंद्र पटेल यांची गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून सर्वांनी एकमत दिले. भूपेंद्र पटेल माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात. अहमदाबाद महापालिकेच्या स्थायी समितीचं सभापती म्हणूनही भूपेंद्र पटेल यांनी काम पाहिलं आहे. 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भूपेंद्र पटेल अहमदाबादच्या घाटलोडिया येथून एक लाखापेक्षा जास्त मतांनी विजयी झाले होते. भूपेंद्र पटेल यांना "दादा" म्हणूनही ओळखले जाते.

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासमोर आता नवीन आव्हान उभी राहणार आहेत. गेल्या दोन दशकांपासून गुजरातमध्ये भाजपाची सत्ता आहे. मात्र दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानं भाजपासमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. तर नुकत्याच झालेल्या काही सर्वेंमधून गुजरातमध्ये सत्ता बदलाचे वारे वाहू लागल्याची चिन्हे दिसत आहेत.

अशा परिस्थितीत मुख्यमंत्री भुपेंद्र पटले यांच्यासमोर गुजरातमध्ये भाजपाची सत्ता राखण्याचं मोठ आव्हान आहे. मात्र तेही गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walk According to Age: २० ते ६० वयानुसार रोज किती चालावं? जाणून घ्या आरोग्यासाठी योग्य चालण्याचं प्रमाण

Maharashtra News Live Update:ठाणे शहरात मुसळधार पावसाला सुरुवात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI चं निधन; पोलिस दलात हळहळ

Banan Benefits: सकाळी रिकाम्या पोटी केळी खावी की नाही? जाणून घ्या हे ७ फायदे आणि परिणाम

Election Results : काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला, बहुमत नसतानाही भाजपची सत्ता, क्रॉस व्होटिंगने पलटला सगळा खेळ

SCROLL FOR NEXT