Gujarat Shock Teen brutally killed Brother and Kills Pregnant Sister-in-Law Saam Tv
देश विदेश

आधी भावाचा खून, नंतर वहिनीवर बलात्कार करून पोटावर लाथ मारली, भ्रूण गर्भाशयाच्या बाहेर येताच मृत्यू

Horrific Crime in Gujarat Village: गुजरातमध्ये कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांडामुळे गाव हादरलं; अल्पवयीन आरोपीनं आधी भावाची हत्या केली. नंतर वहिनीवर बलात्कार करून तिचा जीव घेतला.

Bhagyashree Kamble

कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांडाचा प्रकार गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील एका गावातून उघडकीस आला आहे. पोलीस तपासात अल्पवयीन आरोपीनं आपल्या मोठ्या भावाची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीनं गर्भवती वहिनीवर बलात्कार करून तिचा देखील खून केल्याचं उघड झालं. हा धक्कादायक प्रकार १६ ऑक्टोबर रोजी घडला असून, शुक्रवारी मृतदेह सापडल्यानंतर संपूर्ण घटना उघडकीस आली.

प्राथमिक चौकशीत असे समोर आले की, आरोपी हा एका डेअरीमध्ये काम करीत होता. तो आपल्या भावावर प्रचंड रागावला होता. भावासोबत कडाक्याचे भांडण झाले होते. पैशांच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे. आरोपीनं रागाच्या भरात त्याला मारहाण केली. तसेच डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले. आरोपीचा मोठा भाऊ रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडला.

हा प्रकार पाहून आरोपीची वहिनी प्रचंड घाबरली. त्यानं ६ महिन्यांच्या गर्भवती वहिनीसोबत जबरदस्ती लैंगिक संबंध ठेवले. वहिनी याबाबत पोलिसांना माहिती देईल म्हणून तिच्या पोटावर लाथा मारल्या. तसेच गळा आवळून पीडित महिलेची हत्या केली. या मारहाणीत गर्भवती महिलेचं भ्रूण गर्भाशयातून बाहेर आले.

या प्रकरणानंतर आरोपीनं याबाबतची माहिती आईला दिली. आईनं मुलाला भाऊ आणि वहिनीचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तपासाला सुरूवात केली. आरोपीनं मृतदेह पाच फूट खोल खड्ड्यात पुरल्याची माहिती मिळाली. त्यांनी पुरलेले मृतदेह बाहेर काढले. तसेच शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले.

आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मृतदेह पोस्टमार्टमसाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. वैद्यकीय अहवाल समोर आल्यानंतर पुढील तपास कऱण्यात येईल. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Baba : चुटक्या वाजवत भूत उतरवणाऱ्या भोंदू बाबाला अटक, कोल्हापूर पोलिसांची कारवाई

''३० व्या मजल्यावरच्या खिडकीत उतरुन..'', अनंत गर्जेने पत्नीच्या टोकाच्या पावलावर दिली प्रतिक्रिया, प्रकरणात नवा ट्वीस्ट?

Kalyan : कल्याणमधील धक्कादायक प्रकार! महाविद्यालयातच नमाज पठण

Shocking : आत्याच्या घरी सुरु होती लगीन घाई, कुटुंबीयांची नजर चुकवून १३ वर्षीय मुलीने केली आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर

Male Fertility Decline: तुमच्या जेवणामध्ये असलेल्या 'या' एका घटकाने पुरुषांचा कमी होतो स्पर्म काउंट

SCROLL FOR NEXT