gujarat Shocking  Saam tv
देश विदेश

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

gujarat Shocking : मुख्याधापकाने विद्यार्थ्यासोबत हैवानी कृत्य केलं आहे. या घटनेने शाळेत खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

गुजरातच्या बाबरा तालुकात गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा

मुख्याधापकाकडून विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण

पोलिसांनी मुख्याधापकाच्या मुसक्या आवळल्या

गुजरातच्या अमरेली जिल्ह्याच्या बाबरा तालुकात गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका खासगी शाळेतील मुख्याधापकाने ११ वर्षीय विद्यार्थ्याचं शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गृहपाठ न देण्याचं आमिष देत विद्यार्थ्यासोबत मुख्याधापकाने सैतानी कृत्य केलं आहे. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पीडित मुलाने शाळेत जाण्यास नकार दिला. त्यानंतर आई-वडिलांनी मुलाला विश्वासात घेतलं. त्यानंतर मुलाने रडत रडत कुटुंबीयांना प्रकार सांगितला. मुलगा २०२४ साली बाबरा तालुक्यातील एका खासगी शाळेत शिक्षण घेत होता. पीडित मुलाच्या गावातील ३०-३५ मुले शाळेत होते. शाळेला जायला शाळेची बस होती. दोन दिवसांपूर्वी मुलगा आई-वडिलांसमोर रडू लागला होता. कुटुंबीयांनी विश्वासात घेतल्यानंतर पीडित मुलाने मुख्याधापकाचं हैवानी कृत्य सांगितलं.

पीडित मुलाने सांगितलं की, 'मुख्याधापक मागील एका वर्षांपासून त्याच्यासोबत अश्लील कृत्य करत आहे. मुख्याधापक केबिनमध्ये एकटं बोलवायचा. कॉम्प्यूटर लॅब, शाळेच्या मागे, टेरेस आणि जुन्या बाथरुममध्ये नेऊन मुख्याधापक लैंगिक शोषण करायचा.

लैंगिक शोषणाचा भंडाफोड होऊ नये, यासाठी मुख्याधापकाने पीडित विद्यार्थ्याला वेगवेगळे आमिष दिलं. 'घरात कोणाला सांगू नको. मी तुला शाळेत तुला काहीच बोलणार नाही. तुला गृहपाठ देखील देणार नाही, यामुळे पीडित विद्यार्थ्याने कुठेही वाच्यता केली नव्हती.

आईच्या सहकार्याने पीडित मुलाच्या जबाबावरून पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला या आरोपी मुख्याधापकाच्या विरोधात बीएनएस आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. . त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुख्याधापकाच्या मुसक्या आवळल्या. आरोपीला कोर्टात सादर केलं. त्यानंतर कोर्टाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच पोलिसांनी पुढील तपासही सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ajit Pawar : 'सोनं स्त्रियांनाच शोभून दिसतं'; पुण्यातल्या गोल्डमॅनना अजितदादांच्या कानपिचक्या, VIDEO

Pune Airport : पुण्यात एअर इंडियाच्या विमानात बिघाड? प्रवाशांना मनस्ताप, VIDEO

Bhandup Railway Station : मध्य रेल्वेवरील स्थानकावर अचानक बत्ती गुल; नेमकं काय घडलं? VIDEO

Health Tips: चपाती आणि भात खाल्ल्याने वजन वाढते का?

SCROLL FOR NEXT