Gujrat Ahemdabad Crime news Saam Tv
देश विदेश

Crime news : बंद खोलीत ३८ महिला आणि ४३ पुरुष, पोलिसांची धाड पडली, धक्कादायक प्रकार उघड; ८१ जण सापडले कचाट्यात

Gujrat Ahemdabad Crime news : अहमदाबादच्या सानंद परिसरात सुरू असलेली अवैध पार्टी पोलिसांनी उध्वस्त केली. परदेशी दारू, हुक्का आणि लक्झरी गाड्या जप्त करत ८१ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Alisha Khedekar

  • अहमदाबादमध्ये अवैध पार्टी उध्वस्त

  • ८१ जण पोलिसांच्या ताब्यात

  • परदेशी दारू, हुक्का आणि लक्झरी गाड्या जप्त

  • पार्टीचा मुख्य आयोजक आणि पुरवठा साखळीचा तपास सुरू

गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये उच्चभ्रू सोसायटीतील एका खोलीत २५व्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टी सुरू होती. या पार्टीत तब्बल ८१ जणांचा समावेश होता. त्यामध्ये ३८ महिला आणि ४३ पुरुष उपस्थित होते. डीजेच्या गाण्यावर पाहुणे मंडळी थिरकत होती, दारू आणि हुक्काचा धूर घरभर पसरला होता, इतक्यात पोलिसांनी एंट्री केली आणि सगळचं उध्वस्त केलं.

पोलिसांना अहमदाबादमध्ये बुधवारी सानंद परिसरातील निर्वाणा ग्रीन्स वीकेंड होम्स येथे होणाऱ्या अवैध पार्टीची गुप्त माहिती मिळाली होती. या गुप्त माहितीवरून पोलीस सापळा रचत ठरलेल्या ठिकाणी पोहचले. पार्टी रूमच्या आत प्रवेश करताच पोलिसांना जेवणाची मांडणी, केक, ११ टेबल, तसेच परदेशी दारू आणि हुक्क्यांची स्वतंत्र व्यवस्था दिसून आली.

पार्टीतील बहुतांश पाहुण्यांचे वय ३५ ते ४५ दरम्यान होते. पोलिसांनी छापा टाकताच एकच गोंधळ उडाला आणि अनेक जण पळण्याचा प्रयत्न करत होते. मात्र कानून के हात लंबे होते है, पोलिसांनी पार्टीत उपस्थित सगळ्यांना ताब्यात घेतले. या बेकायदेशीर पार्टीत परदेशी दारूच्या अनेक बाटल्या, १० हून अधिक हुक्का पाइप्स, तसेच कार्यक्रमस्थळी उभ्या असलेल्या २० पेक्षा जास्त लक्झरी गाड्या जप्त केल्या. या सर्व व्यवस्थांवरून हा कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट होत असून, शहरातील श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांसाठीच ही पार्टी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

सानंद पोलिसांच्या माहितीनुसार, पुरुषांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, तर महिलांना कायदेशीर नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. उपस्थितांमध्ये धनाढ्य कुटुंबातील वारसदार, तसेच वैद्यकीय आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्ती असल्याने पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. या प्रकरणाचा तपास आता अधिक तीव्र करण्यात आला आहे. बेकायदेशीर दारू आणि हुक्क्यांचा पुरवठा कुठून झाला, तसेच या पार्टीचा मुख्य आयोजक कोण होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahanu : १६व्या शतकातील 'हा' किल्ला आजही आहे जिवंत, तुम्ही कधी पाहिलाय का?

Black Tea for High Blood Pressure: उच्च रक्तदाबाचा त्रास असलेले रूग्ण ब्लॅक टी पिऊ शकतात का?

Vinod Kambli : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी वृद्धाश्रमात, अवस्था पाहून चाहते इमोशनल; Video व्हायरल

Maharashtra News Live Update: पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला २४ तास पूर्ण

Famous Actor : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावाला लाच घेताना रंगेहात पकडलं, पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT