Heart Attack Death Viral Video  Saam TV
देश विदेश

Viral Video : हसत-खेळत वडिलांशी गप्पा मारत होती व्यक्ती; अवघ्या ५ सेकंदातच झाला मृत्यू, थरकाप उडवणारी घटना

Heart Attack Death Viral Video : गेल्या काही आठवड्यांमध्ये देशात हृदयविकाराच्या झटक्याने अनेकाचे मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

Heart Attack Death Viral Video : गेल्या काही आठवड्यांमध्ये देशात हृदयविकाराच्या झटक्याने अनेकाचे मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यासंदर्भातील अनेक धडकी भरवणारे व्हिडिओ इंटरनेटवर समोर आले आहेत. कुणाचा नाचताना, कुणाचा दांडिया खेळताना, तर कुणाला भर मंडपात हार्ट अटॅक आल्याच्या घटना घडल्या आहेत. तरुणांपासून ते वृद्धापर्यंत कुणालाही हार्ट अटॅक येताना दिसत आहे. (Breaking Marathi News)

गुजरातमधील वलसाड येथे असाच एक प्रकार घडला आहे. एक व्यक्ती दुचाकीवर बसून आपल्या वडिलांसोबत गप्पा मारत होता. तेव्हा बोलता-बोलता तो अचानक दुचाकीसह जमिनीवर कोसळला. वडिलांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, त्यापूर्वीच या व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

या थरारक घटनेचा व्हिडीओ (Viral Video) देखील समोर आला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना धडकी भरली आहे. दीपक भंडारी (वय ५२ वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दीपक यांच्या अचानक निघून जाण्याने भंडारी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक भंडारी हे दीव-दमण येथे राहतात. त्यांचे देवक परिसरात हॉटेल आहे. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते हॉटेलमध्ये गेले. कर्मचाऱ्यांशी गप्पा मारल्यानंतर ते बाहेर आले. दरम्यान, दुचाकीवर बसून वडिलांसोबत गप्पा मारत असताना अचानक दीपक हे खाली कोसळले.

त्यानंतर वडिलांनी त्यांना हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनीही दिली आहे. दरम्यान, अंगावर काटा आणणारी ही संपूर्ण घटना हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून आणखी ६१,१४६ महिलांचे अर्ज बाद, तुमचं नाव नाही ना?

Manikrao Kokate : रोहित पवारांनी आणखी एक पत्ता काढला, कृषीमंत्र्यांवर केला गंभीर आरोप

Igatpuri Tourism : पावसाच्या सरी अन् धुक्याची चादर, इगतपुरीजवळ वसलाय निसर्गाचा अद्भुत नजारा

Ladki Bahin Yojana : लाडकीमुळे महाराष्ट्रातील ४ योजना बंद; लाभार्थी शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT