file Photos Saam tv
देश विदेश

Gujarat News: तलावात आंघोळीला गेले अन् अनर्थ घडला; ५ अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

Gujarat News: गुजरातमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. गुजरातच्या बोटाद जिल्ह्यात तलावात बुडून ५ अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Vishal Gangurde

Gujarat News: गुजरातमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. गुजरातच्या बोटाद जिल्ह्यात तलावात बुडून ५ अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या पाचही मुलांचं साधारण वय १६ ते १७ असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील बोटाद शहराजवळील कृष्णा सागर तलावाजवळ दोन मुले त्यांच्या आजोबासोबत फिरायला गेले होते. त्यावेळी लहान मुलांनी आजोबाकडे तलावात जाऊन आंघोळ करण्यासाठी हट्ट केला. त्यानंतर आजोबांनी त्यांना तलावात उतरण्यास परवानगी दिली. त्यानंतर ही दोन मुले तलावात उतरले.

तलावात उतरल्यानंतर ही दोन मुले खोल पाण्यात गेल्याने बुडू लागले. त्यानंतर तलावात आंघोळ करणाऱ्या दुसऱ्या तीन मुले वाचवायला गेले. मात्र, यावेळी अनर्थ घडला. यावेळी तलावात पाच जणांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेचा बोटाद पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

वृत्त संस्थेच्या माहितीनुसार, कृष्णा सागर तलावात बुडून मृत्यू झालेल्या मुलांचं वय साधारण वय १६ ते १७ च्या दरम्यान आहे. या घटनेत मृत्यूमुखी झालेल्या मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच पोलसांनी घटनास्थळी उपस्थित आजोबांची देखील चौकशी केली आहे.

दरम्यान, कृष्णा सागर तलावाजवळ अनेक जण आंघोळीसाठी येत असतात. स्थानिकांच्या माहितीनुसार, ही घटना खूपच धक्कादायक आहे. या तलावात मोठ्या संख्येत नागरिक आंघोळ करतात. त्यामुळे प्रशासनाने काही उपाय केले पाहिजेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. पाच मुलांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबांवर शोककला पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रील स्टारकडे आढळला हत्यारांचा साठा

Numerology: सावधान! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तींसाठी घातक आहे एप्रिलचा महिना

Ashok Kharat Case: मोठी बातमी! अशोक खरातचे सगळे कारनामे समोर येणार? SIT ने पुन्हा घेतला ताबा

Belly Fat: जीम-डाएटने बेली फॅट कमी होत नाहीये? तुमची ही एक चूक ठरतेय धोकादायक

Poonam Pandey: आधी मरणाचं नाटक आणि आता म्हणते, 'मी प्रेग्नेंट नाही...'; पूनम पांडेने पुन्हा केली चाहत्यांची मस्करी

SCROLL FOR NEXT