Gujarat News Saam tv
देश विदेश

Political News : राजकीय भूकंप, मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांचा राजीनामा; गुजरातमध्ये राजकीय उलथापालथ

Gujarat News : गुजरातमध्ये मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे गुजरातमध्ये राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे.

Vishal Gangurde

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता सर्व मंत्र्यांनी एकत्र राजीनामे दिले आहेत

भाजप नेतृत्वाच्या आदेशानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले आहेत.

गुजरातमध्ये सत्तास्थितीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे

गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपमधील वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानंतर गुजरातमधील मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मंत्र्यांना राजीनाम्याविषयी सूचना दिल्या. त्यानंतर मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपावला. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल आज रात्री राज्यपालांची भेट घेत मंत्र्यांचे राजीनामा सोपावतील. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे. या राजकीय घडामोडीविषयी भाजप किंवा मुख्यंत्र्यांच्या कार्यालयातून कोणतंही अधिकृत भाष्य करण्यात आलेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या गांधीनगर येथील महात्मा मंदिरात शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित राहतील.

सूत्रांच्या माहितीनुसार, गुजरातचे प्रदेशाध्यक्ष जगदीश विश्वकर्मा यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना वगळून राज्य सरकारमधील सर्व १६ मंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगितलं. आता मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे १६ मंत्र्यांचे राजीनामे राज्यपालांकडे सोपावतील.

भाजपमधील सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षात फेरबदल आणि सरकारमध्ये नवीन ऊर्जा निर्माण व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. पक्षातील नेतृत्वात बदल करून भविष्यातील राजकीय रणनीती सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. गुजरातमध्ये २०२७ साली विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी भाजपकडून नवीन प्रशासकीय आणि राजकीय टीम तयार करण्याचे काम सुरु आहे. भाजपच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! जामखेडमधील हॉटेलवर अंदाधूंद गोळीबार, रोहित पवारांच्या पायाला लागली गोळी

Papad Curry Recipe : रोजची भाजी खाऊन कंटाळलात? मग, झटपट बनवा 'पापड करी'

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यासोबत झोपेत भयंकर घडलं; डोक्यावरचे आणि भुवयांवरचे केस कापले|VIDEO

Maharashtra Live News Update: केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

ED Raid : ईडीची सर्वात मोठी कारवाई; ३५०० कोटींच्या १६० मालमत्ता जप्त, नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT