Rahul Gandhi Latest News In Marathi SAAM TV
देश विदेश

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधी यांना गुजरात हायकोर्टाचा दणका; मानहानीच्या प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा कायम

मोदी आडनावाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी याचिकेत गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधींना दिलासा दिला नाही.

Vishal Gangurde

Rahul Gandhi News: काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांची मानहानी प्रकरणावरील पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्दच राहणार आहे. त्याचबरोबर राहुल गांधींना सुनावण्यात आलेली दोन वर्षांची शिक्षाही कायम राहणार आहे. (Latest Marathi News)

राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, 'मोदी चोर है' या शब्दांचा वापर केला होता. राहुल गांधींच्या या वक्तव्याविरोधात भाजप नेते पुर्णेश मोदी यांनी कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांनी या मानहानी प्रकरणात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर आज गुजरात हायकोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने राहुल गांधींची ही पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. गुजरात हायकोर्टाच्या निर्णयामुळे राहुल गांधींची खासदारकी ८ वर्षांसाठी रद्दच राहणार आहे. तसेच कोर्टाने २ वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत 'सर्व चोरांची नावे मोदी कशी काय? अशी टीका केली होती. यानंतर भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता.

दरम्यान, राहुल गांधी यांना या प्रकरणी सूरत येथील सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याचबरोबर राहुल गांधी यांना शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांचे सदस्यत्व (खासदारकी) रद्द केले होतं. यामुळे राहुल गांधी यांना ८ वर्षांपर्यंत निवडणूक लढवता येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ₹२००० साठी आताच करा हे काम, अन्यथा २२वा हप्ता विसरा

Maharashtra Live News Update : अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

ZP Elections : मिनी विधानसभेचं बिगुल वाजणार, दोन की एकाच एकाच टप्प्यात निवडणूक? वाचा लेटेस्ट अपडेट

Maharashtra Politics: अजितदादांचा पुणेकरांसाठी मोठा वादा, देवेंद्र फडणीस म्हणाले - 'घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं'

Kite Making Ideas: मुलांच्या प्रोजेक्टसाठी पतंग बनवायचाय? या टीप्स फॉलो करा, ५ मिनिटांत झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT