Gujarat Flood  Saam tv
देश विदेश

Gujarat Flood Update: गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार! पुरामुळे जनजीवन विस्कळीत, आतापर्यंत 102 जणांचा मृत्यू

Gujarat Rain Alert: गुजरातमध्ये पुढच्या २४ तासांमध्ये आणखी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Priya More

Gujarat Rainfall : गुजरातमध्ये मुसळधार पावसाने (Gujarat Heavy Rainfall) कहर केला आहे. दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. पावसामुळे आलेल्या पुरामुळे (Gujarat Flood) या भागातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. पाऊ आणि पूर यामुळे आतापर्यंत १०२ जणांचा मृत्यू झाला आहे. पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफकडून (NDRF) बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. अशामध्ये आता गुजरातमध्ये पुढच्या २४ तासांमध्ये आणखी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

गुजरातमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. या पूरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरामुळे रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. पूराचे पाणी गावांमध्ये शिरल्यामुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस आणि पूरामुळे संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे गुजरातमध्ये आतापर्यंत १०२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४,११९ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

मुसळधार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पंचायतीच्या मालकीच्या २७१ रस्त्यांसह एकूण ३०२ रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसंच जवळपास 10 राज्य महामार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. याशिवाय राष्ट्रीय महामार्गही वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात सर्वाधिक ६६ रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर भावनगर जिल्ह्यात 57 आणि पोरबंदरमध्ये 47 रस्ते बंद करण्यात आले आहेत.

गुजरातच्या नवसारी, देवभूमी द्वारका, जुनागड आणि वलसाडमध्ये पावसाने कहर केला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका गुजरातच्या जुनागडला बसला आहे. याठिकाणी आलेल्या पूरामध्ये अडकलेल्या 736 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. बचाव कार्यात 358 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. जुनागडमध्ये गाड्याही वाहून गेल्या. याठिकाणी पूरामुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. पूराच्या पाण्यामध्ये अनेकांचे संसारउपयोगी सामान वाहून गेले आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. त्याचसोबत शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पूरामध्ये अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. गुजरातमध्ये आलेल्या पूरामध्ये गॅस सिलिंडर वाहून गेल्याची घटना घडली आहे. सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये शेकडो गॅस सिलिंडर पूराच्या पाण्यावर तरंगत एकापाठोपाठ एक वाहून जाताना दिसत आहे.

अशामध्ये गुजरातच्या अनेक भागांमध्ये पुढील २४ तासांत अति मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसंच काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 'वलसाड, नवसारी, दमण, दादरा आणि नगर हवेली या ठिकाणी जोरदार पाऊस होईल. सौराष्ट्र आणि कच्छसारख्या इतर भागात पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलका पाऊस पडेल. अहमदाबादमध्येही हलका पाऊस पडेल. दक्षिण गुजरातमध्ये चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडत आहे.', असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT