Gujarat government bans caste-based stickers on private vehicles saam tv
देश विदेश

बाईक-चारचाकीवर जात लिहिणाऱ्यांची आता खैर नाही; वाहनांबाबत 'या' राज्य सरकारचा मोठा निर्णय

Gujrat Government New Rule For Cars and Bikes: जर तुमच्या कार किंवा दुचाकीवर जात दर्शवणारे कोणतेही स्टिकर, शब्द किंवा खूण असेल, तर ती काढून टाकण्याची वेळ आलीय. या राज्याच्या सरकारने खासगी वाहनांवरील जातीशी संबंधित चिन्हे आणि लेखनावर पूर्णपणे बंदी घातलीय.

Bharat Jadhav

  • गुजरात सरकारने खासगी वाहनांवरील जात दर्शवणाऱ्या स्टिकर्सवर बंदी घातली

  • कार आणि दुचाकीवर जात लिहिल्यास गुजरातमध्ये होणार कायदेशीर कारवाई

  • वाहनांवर जात दर्शवणारे शब्द आणि चिन्हे लावण्यास बंदी

जर तुम्ही तुमची कार किंवा दुचाकी चालवताना त्यावर जातीशी संबंधित एखादा शब्द, नाव किंवा चिन्ह लिहित असाल तर तुमच्यावर कारवाई होईल. गुजरात सरकारने खासगी वाहनांवर जात दर्शवणारे फलक, स्टिकर्स किंवा कोणत्याही प्रकारचे लेखन वापरण्यावर बंदी घातलीय. यासंदर्भात सरकारने १७ नोव्हेंबर रोजी अधिकृत अधिसूचना जारी केलीय.

नवीन नियमांनुसार, खासगी वाहनांवर जातीशी संबंधित कोणतेही फलक किंवा मजकूर प्रदर्शित करण्यास आता परवानगी नसणार आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी आगामी काळात राज्यातील सर्व आरटीओ आणि पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील. गुजरात सरकारने १७ नोव्हेंबर रोजी एक अधिसूचना जारी करत 'मोटार वाहन नियमां'मध्ये बदल केले आहेत.

या नवीन तरतुदींनुसार खासगी वाहनांवर जातीशी संबंधित कोणतीही चिन्हे, शब्द, प्रतीके किंवा मजकूर लिहिण्यावर बंदी घालण्यात आलीय. कोणताही व्यक्ती आपल्या कारवर, किंवा बाईकवर जातीचा उल्लेख करणारं स्टिकर लावत असेल तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल. दरम्यान राज्य सरकार सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे काही प्रकरणांमध्ये सवलती देऊ शकते.

गुजरात मोटार वाहन नियमांमधील नियम १२५(१) मध्ये सुधारणा करून त्यात 'जातिदर्शक चिन्हे' म्हणजेच एखाद्याच्या जातीचा बोध करून देणारे शब्द किंवा चिन्हे यांचा समावेश करण्यात आलाय. यासह नियम १३८ अंतर्गत एक नवीन उप-नियम (३) जोडण्यात आलाय. यात स्पष्टपणे नमूद केले आहे की, राज्य सरकारने दिलेल्या सवलतींशिवाय, कोणत्याही खासगी वाहनावर जाहिरातींशी संबंधित साधने, जातीशी संबंधित चिन्हे, प्रतिमा किंवा मजकूर प्रदर्शित करता येणार नाहीत.

वाहनाच्या नंबर प्लेट्सवर कोणत्याही प्रकारचे स्टिकर लावणे किंवा त्यामध्ये फेरफार करण्यास आधीपासूनच मनाई आहे. 'मोटार वाहन कायदा' (Motor Vehicles Act) च्या कलम ३९ नुसार, नोंदणी क्रमांकाच्या पाट्यांशी छेडछाड करणे किंवा नियमांचे उल्लंघन होईल अशा प्रकारे त्यात बदल करणे बेकायदेशीर आहे. अशा प्रकारचे उल्लंघन केल्यास कलम १९२ अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. यासह गुजरात सरकारने केलेल्या एका नवीन दुरुस्तीनुसार, खाजगी वाहनांवर जातीशी संबंधित चिन्हे किंवा उल्लेख प्रदर्शित करण्यास स्पष्टपणे मनाई करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रात्री वारंवार लघवीला जावं लागतंय, काही गंभीर आजाराचे संकेत तर नाहीत ना? जाणून घ्या

हजारो किलोमीटरचा प्रवास करून आला हिवाळी पाहुणा! बोर धरणावर दुर्मिळ ‘युरेशियन स्पॅरोहॉक’चे आगमन

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! कापसाच्या शेतात गांजाची शेती; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

Skin Care : तरूण तुर्क...चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांना करा 'बाय-बाय'! नितळ आणि टवटवीत त्वचेसाठी ५ रामबाण उपाय

या फोटोमध्ये एकूण किती पक्षी लपलेले आहेत?

SCROLL FOR NEXT