Ex Boyfriend ची अश्लिल चॅट व्हायरल करण्याची धमकी Saam Tv
देश विदेश

Ex Boyfriend ची अश्लिल चॅट व्हायरल करण्याची धमकी; 23 वर्षीय मुलीने घेतला गळफास

एक्स बॉयफ्रेंडच्या त्रासला कंटाळून तरुणीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

वृत्तसंस्था

गांधीनगर - गुजरातमधील गांधीनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 23 वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. प्राप्त माहितीनुसार, तिचा एक्स बॉयफ्रेंड तिला वारंवार अश्लिल चॅट व्हायरल करण्याची धमकी देत होता. एक्स बॉयफ्रेंडच्या त्रासला कंटाळून तरुणीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. या घटनेनंतर मानसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गुजरातमधील गांधीनगर येथील एका कॉलेजमधून या तरुणीने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. काही दिवसांपूर्वी ही तरुणी आपल्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. ज्यावेळी या तरुणीने हे पाऊल उचलले त्यावेळी ती घरात एकटीच होती. तर तिचे वडील चुलत बहिणी रुग्णालयात गेले होते.

हे देखील पहा -

कुटुंबाची बदनामी होईल असे वाटत असल्यानेतरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती न देताच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. दुसऱ्या दिवशी वडिलांनी तिची डायरी, मोबाइल फोन आणि बॅग तपासली असता डायरीत जे काही लिहिलं होतं ते वाचून त्यांना धक्का बसला.

डायरीत लिहिले होते की, नारदीपूर गावात राहणारा रुशी आमच्यात झालेले चॅट व्हायरल करण्याची वारंवार धमकी देत होता आणि यामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला रुशीच जबाबदार आहे. त्याच्यामुळेच मी आत्महत्या करत आहे. या घटनेप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं 30000 रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील 18k- 22k आणि 24k चे दर

Mumbai Crime : मुंबई हादरली! १० वर्षाच्या मुलासमोर महिलेवर बलात्कार; गळ्यावर कोयता ठेवून तडीपार गुंडाचं भयंकर कृत्य

Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

Nandurbar : हृदयद्रावक! इकडे बहिणीचा जन्म आणि दुसरीकडे भावाचा मृत्यू; माऊलीच्या आक्रोशाने सातपुडा सुन्न

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT