Gujarat Election Result 2022, PM Narendra Modi/ANI
Gujarat Election Result 2022, PM Narendra Modi/ANI SAAM TV
देश विदेश

Gujarat Election : भाजपच्या ऐतिहासिक विजयामागे PM मोदींची यशस्वी रणनीती; जाणून घ्या या ७ गोष्टी

Nandkumar Joshi

Gujarat Elections Result 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही जादू असल्याचं पुन्हा एकदा या विक्रमी विजयानं स्पष्ट झालंय. ६२ वर्षांच्या इतिहासातीला हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी हा विक्रम काँग्रेसच्या नावावर होता. १९८५ मध्ये काँग्रेसनं १४९ जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसनं हा विक्रमी विजय माजी मुख्यमंत्री माधवसिंह सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली केला होता. आता भाजपनं काँग्रेसला मागे टाकलं आहे.

भाजपनं १५६ जागांवर विजय मिळवला. या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवडणूक रणनीतीला जात असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. पंतप्रधान मोदींनी सात गोष्टींवर भर दिला, ज्यामुळं इतका मोठा विजय भाजपला मिळू शकला. मोदींचे सात अस्त्र मानले जातात ते नेमके कोणते आहेत, हे जाणून घेऊयात.

गुजरातमध्ये भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाचं श्रेय संपूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आखलेल्या निवडणूक रणनीतीला जात असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. गुजरात विजयासाठी मोदींनी अफाट मेहनत घेतली. ते पण अवघ्या २७ दिवसांत. PM मोदींनी ६ नोव्हेंबर रोजी गुजरात निवडणुकीच्या निवडणूक प्रचाराचं रणशिंग फुंकलं. एकूण ३९ प्रचारसभा आणि दोन मोठे रोड शो केले. आपल्या ३९ प्रचारसभांच्या माध्यमातून त्यांनी १३४ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढले. तर रोड शोतून १७ विधानसभा मतदारसंघ कव्हर केले. त्यामुळंच हा ऐतिहासिक विजय भाजपला मिळवता आला, असं बोललं जात आहे. (Gujarat Elections Result 2022)

PM मोदींची नेमकी रणनीती काय होती?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आखलेल्या निवडणूक रणनीतीमुळं गुजरातमध्ये भाजपला ऐतिहासिक विजय मिळवता आला, असं जाणकार सांगतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीच्या एक वर्ष आधीच गुजरातमधलं पूर्ण सरकार बदललं. तसेच निवडणुकीत बड्या नेत्यांना उमेदवारी दिली नाही. तर हमखास विजय मिळवणाऱ्या उमेदवारांना हेरलं. तसंच काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांना तिकीट दिलं.

२०१७ मधील विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात पराभव झाला, तिथं प्रचारावर अधिक भर दिला. तसंच पाच विद्यमान मंत्र्यांना उमेदवारी दिली नाही. तर बंडखोरी मोडून काढली. बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. याशिवाय मी गुजरातचा सुपुत्र आहे, असं सांगणं हा एक या निवडणूक विजयात महत्वाची गोष्ट ठरली.  (Latest Marathi News)

भाजपची मतांची टक्केवारी वाढली

गुजरात निवडणुकीत विरोधक फारसे सक्रीय राहिले नाहीत. मात्र, दुसरीकडे भाजप मैदानात पूर्ण ताकदीनं उतरला होता. त्यामुळंच मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी निवडणुकीत ५९ जागा अधिक मिळवल्या. तर तीन टक्के मते वाढली. २०१७ मध्ये भाजपला ९९ जागांवर विजय मिळवता आला होता. यावेळी १५६ जागांवर विजय मिळाला. २०१७ मध्ये भाजपला ४९.१ टक्के मते मिळाली होती, तर यावेळच्या निवडणुकीत भाजपला एकूण ५२.५ टक्के मते मिळाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur News: 'साम टीव्ही'चा लोगो वापरून प्रेक्षकांची दिशाभूल करणारा व्हिडिओ केला व्हायरल, अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल

Today's Marathi News Live : संभाजीनगर शहरात गॅस सिलिंडरचा स्फोटानंतर लागली आग

Special Report : कोकणात रंगणार ठाकरे विरूद्ध ठाकरे लढाई, सभांचा झंझावात

Sanjay Nirupam : त्यावेळी माझ्यासोबत दगाफटका...; शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करताच संजय निरुपम यांनी सांगितला तो किस्सा

Special Report : Ajit Pawar यांना पुतण्या Yugendra Pawar देणार आव्हान?

SCROLL FOR NEXT