Hardik Patel Resigns Saam Tv
देश विदेश

काँग्रेसचे बडे नेते विकले गेलेत; नेतृत्वावर गंभीर आरोप करत हार्दिक पटेल यांचा राजीनामा

गुजरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

वृत्तसंस्था

अहमदाबाद - गुजरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. अनेक दिवसांपासून ते पक्षावर नाराज असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु होत्या. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना हार्दिक पटेलच्या (Hardik Patel) राजीनाम्याने काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. ट्विट करत त्यांनी याबाबद माहिती दिली आहे.

काँग्रेस सोडताना हार्दिक पटेलने ट्विटमध्ये लिहिले की, आज मी धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, मला विश्वास आहे की माझ्या या निर्णयाचे सर्व सहकारी आणि गुजरातमधील लोक स्वागत करतील, मला विश्वास आहे की, या पावलानंतर मी भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन.

हार्दिक पटेलने काँग्रेसवर काय आरोप केले?

काँग्रेसचे बडे नेते विकले गेले आहेत.

काँग्रेस पक्ष देशहिताच्या आणि समाजाच्या हिताच्या विरुद्ध काम करत आहे.

काँग्रेस आता विरोधापुरतेच राजकारण करत आहे.

राममंदिर उभारणी, CAA-NRC, कलम ३७०, आणि जीएसटीच्या अंमलबजावणीत काँग्रेसने विरोधी भूमिका घेतली होती.

देश संकटात असताना आमचे नेते परदेशात होते.

हार्दिक पटेल काही काळापासून ते काँग्रेस नेतृत्वावर नाराज आहेत. अनेकवेळा त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसचे बडे नेते विकले गेलेत, असेही ते म्हणाले आहेत. हार्दिक पटेल यांच्या राजीनाम्यामुळे आता गुजरात काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ऐन गुजरात विधानसभा निवडणुकांपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

VIDEO : शाब्बास! असं धाडस करायला वाघाचं काळीज लागतं, तरुणानं ३ मजले चढून २ मुलांना आगीतून वाचवलं

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा, स्लीप वाटण्यावरून वाद

Pune Crime: थंड वडापाव दिला म्हणून ग्राहक तापला, स्नॅक्स सेंटरचालकाला काचेची बरणी फेकून मारली

SCROLL FOR NEXT